लाइव्ह शो दरम्यान 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'कडून मोठी चूक; अभिनेत्री Oops Moment ची शिकार

साऊथ सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदान्ना सध्या खूप चर्चेत आहे.

Updated: Apr 27, 2022, 06:18 PM IST
लाइव्ह शो दरम्यान 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'कडून मोठी चूक; अभिनेत्री Oops Moment ची शिकार title=

मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदान्ना सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या 'पुष्पा' सिनेमाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. रश्मिकाला दररोज मुंबईत स्पॉट केलं जातं आणि तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण नॅशनल क्रशला एका मुलाखतीत एका उप्स मोमेंटला बळी पडावं लागलं.

रश्मिकाचे ब्लॉकबस्टर सिनेमा
'पुष्पा' हा ब्लॉकबस्टर चित्रपट खूप चर्चेत होता. साऊथपासून ते नॉर्थ पर्यंतच्या प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह होता. या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होती. पुष्पाच्या यशानंतर सर्वजण रश्मिका मंदान्नाला ओळखू लागले असून तिला अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स आल्या आहेत.

रश्मिका का ऊप्स मोमेंटची शिकार
सोशल मीडियावर लोकं रश्मिका मंदान्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका लाइव्ह इव्हेंटमध्ये ऊप्स मोमेंट ची शिकार बनली आहे. लाईव्ह इव्हेंटमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मुलाखती दरम्यान, ती तिच्या पायांची स्थिती बदलते. आणि ती बार्डरोब मॉलफंक्‍शनची शिकार ठरते.