'जी गोष्ट काही वर्षांपूर्वी करायला हवी...', संतापलेल्या Rashmika Mandanna च्या पोस्टला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा

रश्मिकानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Nov 9, 2022, 10:17 AM IST
'जी गोष्ट काही वर्षांपूर्वी करायला हवी...', संतापलेल्या Rashmika Mandanna च्या पोस्टला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा   title=

मुंबई :  दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच रश्मिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या पोस्टमधून रश्मिकानं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. 

रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत रश्मिकानं एक फोटो शेअर केला आहे. तर रश्मिका कॅप्शन देत म्हणाली, 'गेल्या काही दिवसांपासून किंवा आठवडे किंवा महिन्यांपासून किंवा कदाचित आता काही वर्षांपासून मला सतावत आहेत आणि मला वाटतं की मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. मी फक्त माझ्यासाठी बोलत आहे, जी गोष्ट काही वर्षांपूर्वी करायला हवी होती ती मी आता करते. मी माझ्या करिअरला सुरुवात केल्यापासून मला रोष सहन करावा लागत आहे. सततच्या ट्रोलिंग आणि नकारात्मकतेसाठी मी एका पंचिग बॅगसारखी झाली आहे.'

हेही वाचा : सलमानच्या आयुष्यात 'जुनं प्रेम' परतणार; निमित्तही खास आहे, पाहा

पुढे रश्मिका म्हणाली, 'मी जे आयुष्य निवडलं त्याची एक किंमत आहे हे मला माहित आहे. मी प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल असं नाही आणि मी खरंच प्रत्येक व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करत नाही. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या पसंतीस उतरली नाही म्हणून सतत द्वेष पसरवत आहात. तुम्हाला सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून मी दिवसेंदिवस किती मेहनत करते हे मला माहित आहे. मी केलेल्या कामातून तुम्हाला जो आनंद मिळतो ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला आणि मला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो ते काम करण्यात मला आनंद मिळतो आणि ते करण्याचा प्रयत्न करते.' 

रश्मिकाची ही पोस्ट वाचा :

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे रश्मिका म्हणाली, 'ही प्रचंड वाईट गोष्ट आहे आणि विशेषत:  ज्या गोष्टी मी बोललेच नाही त्या इंटरनेटवर व्हायरल करून माझी खिल्ली उडवण्यात येत आहे. मला हे जाणवलं आहे की मुलाखतीत सांगितलेल्या काही गोष्टी माझ्या विरोधात गेल्या आहेत. त्याचे चुकीचे तात्पर्य इंटरनेटवर व्हायरल करण्यात येत आहे. जे माझ्यासाठी आणि माझी इंडस्ट्री बाहेर किंवा इंडस्ट्रीत असणाऱ्या माझ्या संबंधांसाठी हानिकारक आहे. तटस्थपणे केलेल्या टीका मला आवडतात कारण त्यांच्यामुळे मला काय सुधारणा करण्याची गरज आहे आणि अजून चांगल काम मी कसं करू शकते हे सजमून घेण्यासाठी. पण नकारात्मकता आणि रोषचं काय?' 

पुढे रश्मिका म्हणाल,'बऱ्याच काळापासून याकडे दुर्लक्ष करण्यास मला सांगितले होते. पण आता ही परिस्थिती आणखी बिघडली आहे. या गोष्टींवर बोलून मी कोणाची मने जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. सतत मिळणाऱ्या या द्वेष आणि नकारात्मकतेमुळे मला स्वत: वर काही बंधन आणायची नाहीत.' 

पुढे रश्मिका म्हणाली, 'दरम्यान, तुमच्याकडून मिळालेले सर्व प्रेम मला माहित आहे. तुम्ही दिलेल्या सततच्या प्रेमानं आणि पाठिंब्यानं मला पुढे जाण्याची हिंमत मिळते. सगळ्यांसाठी खूप खूप प्रेम, ज्या लोकांसोबत मी काम केलं आहे, त्या लोकांसाठी खूप प्रेम. मी कठोर परिश्रम करत राहीन आणि तुमच्यासाठी अधिक चांगलं काम करेन. कारण मी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही आनंजी असाल तर मला आनंद होतो. सगळ्यांना चांगली वागणूक द्या. आपण स्वत: चं एक चांगल आणि नवीन Version होण्याचा प्रयत्न करत आहोत.' रश्मिकाच्या या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिला आहे.