शिल्पा शेट्टीच्या कुटुंबात वादळ; शेवटी ते नातं तुटलंच

दोघं कलाकारांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Jul 27, 2022, 12:05 PM IST
शिल्पा शेट्टीच्या कुटुंबात वादळ; शेवटी ते नातं तुटलंच title=

मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) सध्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. बिग बॉस ओटीटीनंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढंच नाही तर शमिताच्या वाढदिवशीही राकेश तिच्या कुटुंबीयांसोबत दिसला. गेल्या काही दिवसांपासून राकेश आणि शमिता यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत असताना दुसरीकडे त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. त्यावर शमिता आणि राकेशने सोशल मीडियावर फोटो पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना दुखत धक्का दिला आहे. 

राकेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे की 'मी आणि शमिता आता एकत्र नाहीत. नशिबानं अत्यंत असामान्य परिस्थितीत आमचे मार्ग वेगळे केले. शाराच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचे आणि पाठिंब्यासाठी आभार. एक खाजगी व्यक्ती असल्यामुळे मला माझे ब्रेकअप जाहीरपणे सांगायचे नव्हते, पण मला वाटतं की आमच्या चाहत्यांना ही बातमी माहित असनं हा त्यांचा हक्क आहे.'

यासोबतच शमिता शेट्टीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आणि लिहिले की, 'मला वाटते ते क्लिअर करणं गरजेचं आहे...राकेश आणि मी आता एकत्र नाही... आणि आम्हाला विभक्त होऊन बराच काळ झाला...पण हा म्युझिक व्हिडीओ सगळ्या चाहत्यांसाठी आहे. ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. तुमचं प्रेम आमच्यावर असचं राहू द्या. तुमच्या प्रेमासाठी कृतज्ञ आहे.'

 

शमिता आणि राकेश यांची पहिली भेट बिग बॉस ओटीटीमध्ये झाली होती. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही, मात्र ते अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, राकेशनं शमिताला "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 'एक एनर्जी असते, जी दोन व्यक्तींना एकत्र आणते. आम्ही आनंदी आहोत. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. जर तुमची मैत्री चांगली असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्यावर परिणाम होत नाही. तिचं मन खूप चांगलं आहे. जे प्रामाणिक आहेत त्यांचा मी आदर करतो. आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत.’