Shocking ! बॉलिवूड स्टार रॅपर बादशाहचा अपघात

आगामी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अपघात 

Updated: Feb 6, 2020, 07:04 PM IST
Shocking ! बॉलिवूड स्टार रॅपर बादशाहचा अपघात  title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि पंजाबी रॅपर बादशाह (Badshah) चा कार अपघात झाला आहे. लुधियानात आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या बादशाहचा अपघात झाला आहे. बादशाहच्या कार अपघातामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात नॅशनल हायवे 1 वर झाला आहे. हायवेवर टँकरने आर्मी ट्रकला टक्कर दिल्यावर याचा फटका 50 गाड्यांना बसला. या भयंकर टक्करमध्ये बादशाहची कार देखील होती. महत्वाचं म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Nature has the ability to turn the most barren places into the most beautiful ones in a fraction of a second. A trip to the mountains is always a humbling experience. Above the world, closer to the skies yet you feel so small and so insignificant in the whole scheme of things which you actually are. Standing at the horizon where you feel one with everything. Feeling one with the sky, feeling one with the earth and feeling one with yourself. This picture was taken at 2 am and i was able to see a lot of shooting stars. There is no formation of words or sentences that would justify the view and the experience. Thank you mountains for cleansing the soul once again. Pic by @arya.sahil

A post shared by BADSHAH (@badboyshah) on

असं म्हटलं जातंय की, अपघातादरम्यान बादशाहसोबत पंजाबी गायक आणि त्याचा मित्र एमी विर्क देखील होती. मात्र अद्याप या अपघातावर बादशाहकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

बादशाह याने 'और दस कितनी तरीफां', 'मर्सी', 'अख लड जावे' आणि 'मुन्ना बदनाम' सारखी अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये धम्माल सुरी आहे. एवढंच नव्हे तर गेल्यावर्षी बादशाहने 'खानदानी शफाखाना' सिनेमातून अभिनयात डेब्यू केला होता.