नवीन वर्षात रणवीरच्या 'सिंबा'ने शाहरूखच्या 'झिरो'ला टाकलं मागे

पाहा आतापर्यंतची कमाई 

नवीन वर्षात रणवीरच्या 'सिंबा'ने शाहरूखच्या 'झिरो'ला टाकलं मागे  title=

मुंबई : नवीन वर्षात रणवीर सिंहचा 'सिंबा' आणि शाहरूख खानचा 'झिरो' एकमेकांना टक्कर देत आहे. 'सिंबा'प्रदर्शित होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत तर 'झिरो'ला प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहेत. 

पण या फरकातही सिंबाने माजी मारली आहे. अवघ्या चार दिवसात सिंबाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. 

रणवीर सिंहला नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालं आहे. 4 दिवसांत सिंबाने 100 करोड रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाने शाहरूखच्या झिरोला मागे टाकलं आहे. 

सिंबा सिनेमा 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने सुरूवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमाचा बजेट 80 करोड रुपये असून 4 दिवसातंच ही कमाई पूर्ण केली आहे. 

सिनेमा समीक्षक रमेश बाला यांच ट्विट आहे की, सिंबाने सोमवारी म्हणजे 31 डिसेंबर रोजी जवळपास 22 करोड कमाई केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत 100 करोड रुपये कमाईचा आकडा पार केला आहे. 

पहिल्या दिवशी 20.72 करोड तर दुसऱ्या दिवशी 23.33 करोड आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी एकूण 100 करोड रुपयांची कमाई केली आहे.

या सिनेमाच्या चांगल्या कलेक्शनमुळे रणवीर सिंहच्या 2019 ची सुरूवात चांगली झाली आहे. 'झिरो' सिनेमाचं 11 दिवसांच कलेक्शन 80 करोड रुपये असून सिंबाने या सिनेमाला मागे टाकलं आहे.