Happy Birthday Sonali...., सोनालीच्या वाढदिवसानिमित्त पतीने लिहिली 'ही' खास पोस्ट

माझ्या आयुष्यात तुझं स्थान.... 

Updated: Jan 1, 2019, 01:58 PM IST
Happy Birthday Sonali...., सोनालीच्या वाढदिवसानिमित्त पतीने लिहिली 'ही' खास पोस्ट title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मेटास्टेटीक कॅन्सरशी लढा देणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मायदेशी परतली आहे. कॅन्सरचा मोठ्या धीराने सामना करणारी ही सौंदर्यवती आपल्या कुटुंबासोबत काही खास क्षम व्यतीत करत असून, ती भलतीच आनंदातही दिसत आहे. 

सोनालीच्या आनंदास कारणही तसंच आहे. नव्या वर्षाच्या नव्या सुरुवातीसह सोनालीने पदार्पण केलं आहे ते म्हणजे एका नव्या आयुष्यात. आज तिचा वाढदिवस आणि त्याच निमित्ताने एका खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. 

पती गोल्डी बेहेल याच्यासह कुटुंबीय आणि खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सोनालीची बर्थडे पार्टी पार पडली. यावेळी खुद्द सोनालीही माध्यमांसमोर फोटोसाठी पोझ देतांना पाहायला मिळाली. तिच्या चेहऱ्यावरील हास्य अनेकांचीच मनं जिंकून गेलं. 

सोनालीच्या आनंदात भर म्हणजे पती गोल्डी बेहेल याने लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट. तिच्याच वाढदिवसाच्या पार्टीतील एक सुरेख फोटो पोस्ट करत गोल्डीने त्याच्या कॅप्शनमध्ये आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला अर्थात सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

'अनेकजण म्हणतात, तुमचा साथीदार हा तुमचा खास मित्र/ मैत्रिण असतो, तुमचा प्रतिध्वनी असतो, तुमचा आरसा असतो, तुमची ताकद असतो, तुमचं प्रेरणास्थान असतो... आणि माझ्यासाठी तू ते सर्वकाही आहेस', असं त्याने लिहिलं. सोबतच २०१८ हे वर्ष आपल्यासाठी कसा प्रकारे अडचणींचं होतं, पण त्यावरही सोनालीने कसा प्रकारे मोठ्या धीराने मात केली ही बाब अधोरेखित करत ती फक्त आपल्यासाठीच नव्हे, तर तिच्या सभोवती असणाऱ्या अनेकांचीच ताकद झाली, असं तो म्हणाला. 

 
 
 
 

A post shared by Goldie Behl (@goldiebehl) on

गोल्डीने अतिशय सुरेख आणि मोजक्या शब्दांमध्ये सोनालीला दिलेल्या या शुभेच्छा फक्त सोनालीचंच नव्हे, तर इतरांचीही मनं जिंकून गेला. त्यातच सोनालीच्या हसऱ्या चेहऱ्याने या आनंददायी वातावरणाला खऱ्या अर्थाने 'चार चाँद' लावले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.