Kissing Scene सुरु असताना खिडकीतून वीट फेकली पण दीपिका आणि रणवीर थांबलेच नाही, अभिनेत्याचा खुलासा

Ranveer नं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Nov 14, 2022, 02:42 PM IST
Kissing Scene सुरु असताना खिडकीतून वीट फेकली पण दीपिका आणि रणवीर थांबलेच नाही, अभिनेत्याचा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची लव्ह स्टोरी ही 'राम लीला' या चित्रपटाच्या सेटवरून सुरु झाली. कोणतेही कलाकार असो जेव्हा ते एकत्र स्क्रिन शेअर करतात तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. पण 2013 मध्ये जेव्हा 'राम लीला' (Ram-leela) हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना त्यांच्यात असलेलं प्रेम हे दिसून आलं होतं. कदाचित या दोघांच्या रिअल लाइफ केमिस्ट्रीमुळे चित्रपटातील सीन्स हे अधिक जिवंत झाली आहेत. मात्र, तो पर्यंत त्यांच्या रिलेशनशिप किंवा डेटिंगच्या बातम्या सुरु झाल्या नव्हत्या. रणवीर आणि दीपिका त्यानंतर 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि 2018 मध्ये 14 नोव्हेंबर रोजी दोघं लग्न बंधनात अडकले. 

हेही वाचा : Sania Mirza सोबतच्या घटस्फोटावर Shoaib Malik नं दिला दुजोरा? शोएबची 'ती' पोस्ट व्हायरल

एका मुलाखतीत दीपिकानं सांगितलं की दीपिका पहिल्या नजरेतच रणवीरच्या प्रेमात पडली होती. दीपिकानं सांगितले की ती 2012 मध्ये रणवीरला पहिल्यांदा भेटली होती आणि भेटताच तिने त्याला सांगितले 'मला वाटतं की काही कनेक्शन आहे. 'राम लीला'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दीपिका आणि रणवीरचे हे रिलेशनशिप पाहणाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिले व्यक्ती होते. दीपिकासोबतचा त्याचा अभिनय पाहून भन्साळींना काय वाटलं या विषयी रणवीरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, दोघेही रिलेशनशिपमध्ये येतील असे त्यांना वाटले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाला रणवीर -

अनेकवेळा दिग्दर्शकानं कट म्हटल्यानंतरही ते दोघे एकमेकांमध्ये खूप गुंतले होते. तो आणि दीपिका किसिंग सीनमध्ये इतके गुंतले होते की दगड फेकल्यानंतरही थांबले नाही. त्या सीनविषयी सांगत दिग्दर्शक म्हणाला, 'मला राम लीलामधील एक सीन आठवतो, जेव्हा राम आणि लीला किसींग सीनमध्ये एकमेकांमध्ये हरवले होते आणि भन्साळींच्या चित्रपटांमध्ये सर्व काही अगदी वास्तव असल्यामुळे फार कमी व्हिज्युअल इफेक्ट्स असतात. तर आम्ही बेडवर लिपलॉक करत होतो आणि खिडकीतून एक वीट फेकली जाते आणि काच फुटते असा तो सीन होता. पण पहिल्या टेकमध्ये मी आणि दीपिका किस करत होतो आणि पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतलो होतो. ते पाहून भन्साळी म्हणाले की यांना बघ यांच्यात नक्की काहीतरी सुरु आहे. (ranveer singh deepika padukone kept kissing despite stone thrown from the window) 

'राम लीला'नंतरही रणवीर आणि दीपिकाने 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि '83' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे तिन्ही चित्रपट चांगले हिट ठरले. दीपिका आणि रणवीर हे आज बॉलिवूड चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र आता ही धमाकेदार जोडी कोणत्या चित्रपटात एकत्र दिसणार याची प्रतीक्षा आहे.