बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये रणवीर सिंगची वाईट अवस्था? दिसला किडे खाताना

 बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. 

Updated: Jul 8, 2022, 09:15 PM IST
बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये रणवीर सिंगची वाईट अवस्था? दिसला किडे खाताना title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.  रणवीर आता 'वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'मध्ये बेअर ग्रिल्ससोबत धोकादायक गेम खेळताना दिसणार आहे.

हा अभिनेता नेटफ्लिक्सच्या स्पेशल शो  रणवीर vs वाइल्ड विद बेयर ग्रिल्समध्ये दिसणार आहे. या शोमध्ये रणवीर बेअर ग्रिल्ससोबत जंगलात धाडसी कामगिरी करताना दिसणार आहे. यादरम्यान कलाकारही अनेक विचित्र पदार्थ खाणार आहेत. या शोचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग किडे आणि रानडुकराचे प्रायव्हेट पार्ट खाताना दिसत आहे.

बेअर ग्रिल्स रणवीरला कीटक दाखवतो आणि नंतर त्याला काहीतरी खायला देतो. हे खाताना रणवीर सिंगचा चेहरा पाहण्यासारखा आहे. बेअर त्याच्यावर हसताना दिसत आहे. रणवीर सिंग शोच्या प्रत्येक टप्प्यावर जे प्रेक्षक सांगणार तेच तो करणार.

टीझरमध्ये तो म्हणतो की, तुम्ही जे सांगणार तेच मी करणार. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी बेअर ग्रिल्ससोबत धाडसी प्रवास केला आहे. पण रणवीर सिंगची स्टाईल आणि शो पूर्णपणे वेगळा असणार आहे. हा शो नेटफ्लिक्सवर आज म्हणजेच ८ जुलै रोजी प्रदर्शित होईल.