लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'

Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 26, 2023, 12:33 PM IST
लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...' title=
(Photo Credit : Social Media)

Ranveer Singh and Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली आहे. यंदा या शोचं हे आठव पर्व सुरु आहे. यावेळी त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे. यावेळी दीपिकानं म्हटलं की कोणीही हा विचार करू नये की लग्न हे खूप सुंदर असतं, कारण त्याचा सुद्धा एक वाईट काळ असतो. 

या कार्यक्रमात करण जोहरनं त्या दोघांना प्रश्न विचारला की चित्रपटसृष्टीत ते अनेक कलाकारांसोबत काम करतात. त्यामुळे नात्यात सेक्शुअली आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिक राहणं किती कठीण आहे? यावर उत्तर देत दीपिका म्हणाली की रणवीरचं आयुष्या माझ्यापेक्षा वेगळं आहे. त्याच्यावर वेगळे संस्कार आहेत आणि माझं आयुष्य आणि माझ्यावर झालेले संस्कार हे वेगळे आहेत. लग्नाचा अर्थ हा आहे की दोन वेगळे लोक एका नात्यात येतात. आमचं कधी भांडण होत नाही किंवा वाद होत नाहीत असं नाही. आमचे देखील काही वाईट दिवस असतात. पण आम्ही दोघं एकत्र त्याचा सामना करतो. आम्ही जर एकमेकांशी वाद घालतोय याचा अर्थ असा आहे की आम्ही एकमेकांशी बोलतोय. आम्ही प्रत्येक भांडणातून काहीतरी शिकतो. मोठे होतो आणि मूव्ह ऑन करतो. हिच गोष्ट कोणत्याही लग्नाला सुंदर बनवते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिका पुढे लग्नाविषयीच्या गैरसमज असण्यावर म्हणाली की त्यांच्या नात्यात देखील इतर कपल्सप्रमाणे वाईट काळ असतो. जर कोणाला वाटतं की लग्नानंतर सगळं सुंदर आणि छान असेल आणि कोणी तुम्हाला म्हणेल की बेबी, तुझी कॉफी तयार आहे. तर असं होत नाही. लग्न असं होतं नाही. तुमच्या आयुष्यात अनेक दिवस असे येऊ शकतात. पण लग्न एका प्रकारचं काम आहे. तुम्हाला तुमच्या लग्नाला सुंदर बनवण्यासाठी सतत म्हणजेच रोज काम करावं लागतं. 

हेही वाचा : 'माझा एक्स परत येणार'; सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर विकीसमोर रडत होती अंकिता लोखंडे

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 2018 मध्ये गपचूप इटलीमध्ये लग्न केलं. त्याआधी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी अधिकृत काही सांगितलं नव्हतं. पण त्या दोघांनी 2015 मध्ये गपचूप साखरकपुडा केला होता. याविषयी रणवीरनं 'कॉफी विथ करण'मध्ये खुलासा केला आहे. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता ते दोघं सिंघम 3 या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.