राणू मंडलवर Biopic लवकरच; ही अभिनेत्री साकारणार भूमिका

सोशल मीडियावर कोण कधी स्टार बनेल सांगता येत नाही. 

Updated: Sep 4, 2021, 02:07 PM IST
 राणू मंडलवर Biopic लवकरच; ही अभिनेत्री साकारणार भूमिका  title=
मुंबई : सोशल मीडियावर कोण कधी स्टार बनेल सांगता येत नाही. अनेक स्टार्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येत असतात. सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली.
 
कोलकत्याच्या एका रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी राणू मंडल तिच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. इतकंच नाही तर अनेक कार्यक्रमांमध्ये तिने हजेरी लावली. 
 
 या प्रसिद्धीनंतर राणू मंडलवर एक बायोपिक बनवण्यात येणार आहे. मागील वर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सिनेमाची कहानी राणू मंडलच्या जीवनावर आधारीत असणार आहे. चित्रपटाचं नाव ‘मिस राणू मारिया’ असं असणार असल्याचं बोललं जातंय. ऋषिकेश मंडल हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.
 
 अभिनेत्री इशिका डे चित्रपटात राणूची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं शुटींग मुंबई आणि दिल्लीत होणार आहे. इशिकाने सांगितलं आहे की, चित्रपटासाठी ती पहिली चॉइस नव्हती. सुरुवातीला सुदिपा चक्रवर्ती चित्रपटात दिसणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र लॉकडाउनदरम्यान तारखांचं शेड्युल बिघडलं असल्याने इशिकाला चित्रपटात घेण्यात आलं. इशिकाने सेक्रेड गेम्स, लाल कप्तान सारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
 
टीम हिमेश रेशमियाशी संपर्क साधत आहेत. पण अद्याप त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.