राणी मुखर्जीने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता

अभिनेत्री राणी मुखर्जीने अलीकडेच मुंबईच्या खार भागात एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे.

Updated: Aug 10, 2021, 10:56 PM IST
राणी मुखर्जीने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता title=

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीने अलीकडेच मुंबईच्या खार भागात एका पॉश ठिकाणी एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राणीने या वर्षी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जी 4 BHK अपार्टमेंट आहे. बातमीनुसार, या खरेदीमुळे राणी मुखर्जी अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिकेटर हार्दिक आणि कुणाल पंड्या यांची शेजारी बनली आहे. राणी मुखर्जीचं हे नवीन अपार्टमेंट 3545 चौरस फूट क्षेत्रावर पसरलं असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यतिरिक्त, या अपार्टमेंटमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत.

राणीच्या या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे. या अपार्टमेंटमध्ये एक आउटडोअर फिटनेस सेंटर देखील आहे. त्याचबरोबर क्रीडाप्रेमींसाठी रॉक क्लाइंबिंगचीही व्यवस्था असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील खार परिसरातील या राणीच्या अपार्टमेंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे ईथून समुद्राचं दर्शन होतं. बातमीनुसार, राणीच्या या अपार्टमेंटची किंमत 7.12 कोटी आहे.

जर आपण राणीच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर राणीच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मिसेज चटर्जी vs नॉर्वे' असं आहे. राणी मुखर्जी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेल्याचं सांगितलं जात आहे. राणी मुखर्जीच्या या चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी आणि झी स्टुडिओ करत आहेत.

यापूर्वी राणी मुखर्जी 2019 मध्ये 'मर्दानी 2' चित्रपटात दिसली होती. मर्दानी 2 ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि चित्रपटातील राणीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्याचवेळी, राणीचा आणखी एक चित्रपट 'बंटी और बबली 2' सुद्धा रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. राणीसोबत सैफ अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.