व्हिडिओ : रणवीरने दीपिकासाठी गायले खास गाणे

 असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये रणवीरचे दीपिकावरचे प्रेम सर्वांसमोर आले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 30, 2017, 09:22 PM IST
व्हिडिओ : रणवीरने दीपिकासाठी गायले खास गाणे  title=

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका यांनी आपले रिलेशन जगासमोर मान्य केले नाहीत. पण सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये रणवीरचे दीपिकावरचे प्रेम सर्वांसमोर आले आहे. 

दिपिकाने पाहिला व्हिडिओ 

शाहरुख खानच्या नव्या टॉक शो मध्ये दीपिकाने पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली. तेव्हा दीपिकाला रणवीरचा एक व्हिडिओ दाखविण्यात आला. 

रोमॅंटीक सॉंग  

 यामध्ये तो 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे रोमॅंटीक गाणे गात आहे. या व्हिडिओ मेसेजमध्ये शेवटी रणवीर म्हणतो,मंदिर में हो एक जलता दीया, दीया म्हणजे दिपिका म्हणजे तू. 

आयुष्यात हा प्रकाश कायम राहो

 या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने दिपिकाला मेसेज दिला आहे.

 तुझ्याबद्दल काय बोलू ? ज्याप्रमाणे तु करोडो चाहत्यांच्या मनात प्रकाश बनून आलीस, माझ्या आयुष्यात प्रकाश बनून आलीस, मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन की आयुष्यात हा प्रकाश कायम राहो.