Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी आहेत जे या चित्रपटासाठी 10 हजार तिकिटांची आगाऊ बुकिंग करणार आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2023, 12:13 PM IST
Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासून हा चर्चेत होता. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर आहेत. अनेकांनी तर आगावू बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की या चित्रपटाची फक्त हिंदी स्क्रिनिंग आहे ती 4000 पेक्षा जास्त आहे. त्यात आता एक मोठी बातमी समोर आली आहे की रणबीर कपूरनं चक्क 10 हजार तिकिटांची आगाऊ बुकिंग करणार आहे.

खरंतर आदिपुरुष हा चित्रपट 6 हजार 200 पेक्षा जास्त स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर रविवारी या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात होणार असल्याचे म्हटले जाते. तर मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरं अनाथ मुलांसाठी एकट्यानं 10 हजार तिकिट बूक करणार आहे. तर चित्रपट निर्माता राम चरणनं देखील चित्रपटाच्या 10 हजार तिकिटांची आगाऊ बुकिंग करणार आहे. राम चरण देखील अनाथ मुलांना चित्रपट दाखवणार आहे. त्यात काही फॅन्स देखील असणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आदिपुरुष ट्रेलरमुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात अनेक बदल केले. त्यानंतर त्याचा एक नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पण हा ट्रेलर पाहूनही प्रेक्षकांना चित्रपटाकडून आणखी अपेक्षा असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं. रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहून VFX नं ओव्हर लोडेड असल्याचं म्हटलं. तर त्यासोबत त्यांनी सीता हरणच्या त्या सीनला देखील चुकीचं असल्याचं म्हटलं. 

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush

हेही वाचा : Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....

दरम्यान, इतकंच असताना दुसरीकडे या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर हा तिरुपती येथ स्पेशल रिलिज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा प्रभास हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्या ट्रेलरमध्ये जिथे शांत असलेले प्रभू राम दाखवण्यात आले तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रभू राम ही रावणाच्या लंकेवर हल्ला करताना दिसत आहेत. यात कशा प्रकारे त्यांनी रावणाला पराभव केलं ते दिसत आहे. तर या ट्रेलरच्या प्रदर्शनाआधी क्रिती सेनन आणि दिग्दर्शक ओम राऊत हे तिरुपतीच्या मंदिरात गेले होते. त्यावेळी क्रिती सेननला मंदिराच्या परिसरात किस केल्यानं ओम राऊत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.