लग्नात बूट लपवल्यानंतर रणबीरनं आलियाच्या बहिणीला दिले लाखो रुपये? किस्सा ऐकून कपील शर्मांच्या सेटवर सारेच थक्क

Ranbir Kapoor gave this much money to Alia's sister : रणबीर कपूरनं त्याच्या लग्नात आलियाच्या बहिणीनं त्याचे बूट लपवले त्यानंतर किती पैसे दिले याविषयी खुलासा केला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Mar 31, 2024, 12:26 PM IST
लग्नात बूट लपवल्यानंतर रणबीरनं आलियाच्या बहिणीला दिले लाखो रुपये? किस्सा ऐकून कपील शर्मांच्या सेटवर सारेच थक्क title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor gave this much money to Alia's sister : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याचा कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. त्याचं कारण म्हणजे सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांची जोडी जी पुन्हा एकत्र येणार होती. मात्र, यावेळी कपिल शर्मा हा टिव्हीवर नाही तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सवर त्याचा आलेला हा शो The Great Indian Kapil Show आहे. कालच त्याचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. यात पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली होती. या दरम्यान, मस्ती करत असताना कपूर कुटुंबानं अनेक किस्से शेअर केले. अशात रणबीरनं लग्नात त्याचे बूट लपवल्यानंतरचा देखील एक किससा सांगितला आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' दरम्यान, कपिल शर्मानं रणबीर कपूरला विचारलं की त्याच्या लग्नात बूट लपवल्यानंतर आलियाच्या बहिणीला लाखो रुपये दिलेस अशी अफवाह आहे... तर ही गोष्ट खरी आहे का? यावर उत्तर देत रणबीरनं म्हटलं की "नाही, हे सत्य नाही. त्याच्यानंतर रणबीरची आई नीतू कपूर म्हणाल्या, "आम्ही त्यांना काही पैसे दिले." त्यावेळी रणबीरच्या लगेच लक्षात आलं की "विधीनुसार, आलियाच्या बहिणीनं माझ्याकडे काही लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र, त्यानंतर मी त्यांना काही हजारांवर आणलं आणि मग तिनं तितकेच पैसे घेतले." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लवकरच आई-बाबा होणार अथिया अन् केएल राहुल? सुनील शेट्टीच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ काय?

रणबीर कपूरचं हे वक्तव्य ऐकताच होस्ट असलेल्या अर्चना पूरन सिंह यांनी आश्चर्य व्यक्त केलं. अर्चना पूरन म्हणाल्या, फक्त हजारोंमध्ये बस, इतकं कमी. त्यांचं हे वक्तव्य ऐकताच रणबीर म्हणाला, 'हो, लग्न घरात झालं. बूट अजूनही घरातच असतील. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता.' रणबीरचं हे वक्तव्य ऐकताच सगळे हसू लागले. रणबीर कपूरनं यावेळी हे देखील सांगितलं की तो त्याची आई नीतू यांचे दागिने चोरून त्याच्या गर्लफ्रेंड्सला भेट करायचा. त्याशिवाय नीतू कपूर यांनी रणबीरविषयी अनेक आश्चर्यकारक आणि मजेशीर किस्से सांगितले. शोचा पहिलाच एपिसोड चांगलाच व्हायरल झाला आहे.