VIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली'

Ranbir confirms Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship : रणबीर कपूरनं विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदानाचं रिलेशनशिप कन्फर्म करताच लाजलेल्या श्रीवल्लीचा व्हिडीओ एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Nov 25, 2023, 04:47 PM IST
VIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली' title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir confirms Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या 'अ‍ॅनिमल' या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे. ते दोघेही सध्या या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात एका कार्यक्रमामध्ये ते दोघे पोहोचले असता. रणबीरनं रश्मिकाच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. रणबीरनं रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिपवर आश्चर्य होईल असा खुलासा केला आहे. 

रणबीर, रश्मिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप हे तिघेही दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'अनस्टॉपेबल वीथ एनबीके' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी एका सेगमेंटमध्ये संदीप आणि रश्मिका या दोघांना नंदमुरी बालकृष्ण यांनी अर्जुन रेड्डी आणि अ‍ॅनिमल या चित्रपटांपैकी एका चित्रपटाला निवडा असं सांगितलं. त्यावर रणबीरनं रश्मिकाला चिडवण्यास सुरुवात केली, कारण रश्मिकाला सांगायचं होतं की विजय देवरकोंडा आणि रणबीर कपूरमध्ये कोण चांगला अभिनेता आहे. तिला थोडक्यात सांगायचं होतं की कोण उत्तम अभिनेता आहे, कोण रील हीरो आहे आणि कोण तिचा रियल हीरो आहे. जेव्हा रश्मिकानं या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार केलो. तेव्हा नंदमुरी यांनी संदीप यांना विजयला कॉल करण्यास सांगितले. पण विजयनं कॉल मिस केला. त्यावेळी रणबीर म्हणाला की, 'सर, रश्मिकाला फोन करू द्या, विजय संदीपचा कॉल नाही रिसिव्ह करणार.' हे ऐकताच रश्मिका लाजली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : संजय दत्तला होती एन्काऊंटरची भीती! माजी IPS अधिकाऱ्यानं सांगितला येरवडा तुरुंगातील ट्रान्सफरचा किस्सा

रणबीर सेटवर रश्मिकाचा फोन मागवतो आणि बोलतो की विजयला कॉल कर. त्याआधी तो तिला सल्ला देतो की तू कॉन्टॅकवर असलेलं नाव बदलायला हवं असं मला वाटतंय. त्यानंकर रश्मिका विजयला कॉल करते पण तो रिसिव्ह करत नाही. उलट तो सदीप रेड्डी यांना कॉल बॅक करतो. त्यानंतर रश्मिकाला कॉल येतो. जेव्हा ती फोनवर हॅलो बोलते, तेव्हा विजय विचारतो काय सुरु आहे? तेव्हा रश्मिका लाजत बोलते की सगळं ठीक आहे. पण फोन स्पीकरवर आहे तर तू थोडं विचार करून बोल. त्यानंतर शोमध्ये ते सगळे विजयशी गप्पा मारताना दिसतात. जेव्हा विजयचा फोन कट होतो त्यानंतर रणबीर बोलतो की 'किती नॅच्युरल ग्लो आला आहे बघा.'