रणबीर-आलियाचे 'ड्रीम होम' तयार, बंगल्याला दिलं जाणार कपूर कुटुंबातील खास व्यक्तीचं नाव

Ranbir Kapoor Alia Bhatt New House: रणबीर कपूरने बंगल्याबाहेरील बांधकामाची संपूर्ण तपासणी केली. यावेळी नीतू कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित होते. याचा एक व्हिडीओही समोर आला होता. 

नम्रता पाटील | Updated: Mar 28, 2024, 07:45 PM IST
रणबीर-आलियाचे 'ड्रीम होम' तयार, बंगल्याला दिलं जाणार कपूर कुटुंबातील खास व्यक्तीचं नाव title=

Ranbir Kapoor Alia Bhatt New Bungalow : बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ओळखले जाते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लेक राहा आता दीड वर्षांची झाली आहे. रणबीर आणि आलियाप्रमाणेच राहादेखील सतत चर्चेत असते. आता कपूर कुटुंबाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच त्यांच्या नवीन घरात प्रवेश करणार आहेत. आता त्यांच्या या नव्या बंगल्याला कोणाचं नाव दिलं जाणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. 

गेल्या वर्षभरापासून रणबीर कपूर हा सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. रणबीर हा त्याच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळेही सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. आता रणबीर आणि आलियाचे वांद्र्यातील ड्रीम होम तयार झालं आहे. गेल्या वर्षभरापासून रणबीर-आलियाच्या नव्या बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. या बंगल्याचे काम पाहण्यासाठी अनेकदा आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूर हे अनेकदा वांद्र्यात दिसत होते. 

जवळपास 250 कोटी रुपये खर्च 

त्यातच आता रणबीर कपूरने बंगल्याबाहेरील बांधकामाची संपूर्ण तपासणी केली. यावेळी नीतू कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित होते. यावेळीचा एक व्हिडीओही समोर आला होता. यानंतर आता रणबीर आणि आलिया लवकरच या घरात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर हे दोघेही त्यांची कमाई या घरासाठी गुंतवत आहेत. या घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास 250 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हा बंगला शाहरुख खानचा मन्नत आणि अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यापेक्षाही महागडा असल्याचे म्हटलं जात आहे. 

विशेष म्हणजे रणबीर कपूर हा त्याची लाडकी लेक राहाचे नाव या बंगल्याला देणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे राहा ही सर्वात श्रीमंत स्टारकिड ठरणार आहे. यापूर्वी हा बंगला दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज यांच्या नावावर होता. यानंतर कपूर कुटुंबातील एकुलता एक नातू म्हणून ही मालमत्ता रणबीरला मिळाली. या घराव्यतिरिक्त रणबीर आणि आलियाचे मुंबईत विविध ठिकाणी चार फ्लॅट आहेत. याची किंमत जवळपास 60 कोटींच्या आसपास आहे.

‘लव्ह अ‍ॅंड वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, रणबीर आणि आलिया भट्ट सध्या एका चित्रपटाचे शूटींग करत आहेत. ‘लव्ह अ‍ॅंड वॉर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात विकी कौशलही दिसणार आहे. त्यासोबत आलिया ही ‘जिगरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.