तिथे Ranbir-Alia चं लग्न सुरु असतानाच इथे होणारी जाऊ, तोकड्या कपड्यांत जगासमोर....

फार मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती या जोडीनं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली

Updated: Apr 15, 2022, 01:10 PM IST
तिथे Ranbir-Alia चं लग्न सुरु असतानाच इथे होणारी जाऊ, तोकड्या कपड्यांत जगासमोर....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांचाही विवाहसोहळा सध्या Talk of the town झाला आहे. जिथंतिथं या जोडीच्या लग्नाचीच चर्चा  आणि त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. फार मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती या जोडीनं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. (Ranbir Alia Wedding)

यावेळी काही चेहऱ्यांची या लग्नसोहळ्यासाठी असणाऱी हजेरी सर्वांनाच अपेक्षित होती. पण, याच अपेक्षित आमंत्रितांच्या यादीतील एक नाव मात्र विवाहसोहळ्याला दिसलं नाही. 

काहींनी त्यासंबंधीचा प्रश्नही उपस्थित केला, की 'ती' लग्नासाठी आली कशी नाही ? ही 'ती' म्हणजे रणबीरचा आतेभाऊ आदर जैन याची प्रेयसी, अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria). 

कपूर कुटुंबातील आतापर्यंतच्या बऱ्याच कार्यक्रमांना तारानं हजेरी लावली आहे. किंबहुना मागील दोन-एक वर्षांमध्ये तिला अनेकदा या कुटुंबासमवेत पाहिलं गेलं आहे. पण, मग आलियाच्या लग्नाचा ती उपस्थित का नव्हती? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. 

सूत्रांच्या माहितीनुसार तारा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करतेच आहे. 

तारानं नुकतीच केलेली सोशल मीडिया पोस्ट याचा प्रत्यय देत आहे. जिथं ती तोकड्या स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे. लाल रंगाचं आऊटफिट आणि चंदेरी रंगाच्या हाय पेन्सिल हिल्स, मोकळे केस या साऱ्याला मिनिमल मेकअपची जोड ताराचा लूक आणखी उठावदार करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TARA (@tarasutaria)

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aadar Jain (@aadarjain)

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्या क्षणापासून तारानं तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यातही मुख्य मुद्दा म्हणजे आदरशी असणारं तिचं नातं. चर्चा अशाही आहेत की रणबीरमागोमाग आता येत्या काही महिन्यांमध्ये तारा आणि आदरच्या लग्नाच्या तयारीलाही वेग येणार आहे. त्यामुळं कपूर कुटुंबात पुन्हा एकदा कर्तव्य आहे...!