कॅमेरा बघताच रणबीर कपूरची जीभ घसरली, VIDEO मध्ये असं काही कैद झालं की...

रणबीर कपूरच्या या वागण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का 

Updated: Aug 20, 2021, 01:34 PM IST
कॅमेरा बघताच रणबीर कपूरची जीभ घसरली, VIDEO मध्ये असं काही कैद झालं की...  title=

मुंबई : अनेकदा आपल्या अभिनयाने आणि डायलॉगने कलाकार चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत असतात. पण हेच स्टार्स रिअल लाइफमध्ये कॅमेऱ्यासमोर असं काही करतात की चाहत्यांना प्रचंड वाईट वाटतं. असाच एक अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. रणबीर आपल्या एका जवळच्या मित्राला भेटायला वांद्रे येथे गेला होता. नेहमीप्रमाणे पापाराझी यांनी कलाकाराला तेथे देखील कव्हर केलं. फोटो काढले. यावेळी पापाराझीच्या कॅमेऱ्यात असं काही कैद झालं ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. 

पापाराझीला पाहताच रणबीर कपूरच्या तोंडातून शिवी बाहेर पडली. मात्र हा व्हिडीओ आता बीपच्या साऊंडने कव्हर केला आहे. या व्हिडीओत पापाराझीला पाहताच रणबीरचती जीभ घसरली आणि तो पुढे निघून गेला. 

रणबीरचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा कपिल शर्माचा एअरपोर्टचा व्हिडीओ देखील चर्चेत आला आहे. पापाराझी कलाकारांचे फोटो क्लिक करण्यासाठी कुठेही पोहोचतात. अशावेळी कलाकार अनेकदा वेगळ्या अवस्थेतही कॅमेऱ्यात कैद होतात. 

एका व्हिडीओत कपिल शर्मा व्हिलचेअरवर एअरपोर्टवर दिसले. त्यांना पापाराझी कॅमेऱ्यात कॅप्चर करताना भडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत कपिल शर्माचा मूड चांगला दिसत नाही. तो कॅमेरामनवर भडकतो. हा व्हिडीओ देखील तेव्हा चर्चेत आला होता.