रणबीर देशाचा बेजबाबदार नागरिक - कंगना रानौत

रणबीरने कोणत्याही राजकीय विषयावर आपले मत मांडण्यास स्पष्ट नकार दिल्या नंतर कंगनाने रणबीरला देशाचा बेजबाबदार नागरिक असल्याची उपमा दिली.

Updated: Mar 4, 2019, 02:36 PM IST
रणबीर देशाचा बेजबाबदार नागरिक - कंगना रानौत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत नुकताच तिच्या 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' या सिनेमाच्या सक्सेस पार्टी मध्ये दिसून आली. कंगणाच्या 'मणिकर्णिका' सिनेमाने १५० कोटींचा गल्ला जमवला या सक्सेस पार्टीचे आयोजन मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळेस माध्यमांनी तिच्या सोबत अनेक राजकीय विषयांवर सांवाद साधला. या मध्ये  अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचा सुद्धा उल्लेख करण्यात आला. ज्यामध्ये कंगणाने रणबीरला देशाचा बेजबाबदार नागरिक असल्याची उपमा दिली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने कोणत्याही राजकीय विषयावर आपले मत मांडण्यास स्पष्ट नकार दिला हेता. 

रणबीरच्या या वक्तव्यावर कंगणा म्हणाली,'रणबीर कपूरसारखे कलाकार देशाचे बेजबाबदार नागरिक आहेत. कलाकारांनी राजकारण आणि देशाच्या उज्वल  भविष्यासाठी आपले मत मांडणे गरजेचे आहे. रणबीर अशा मुद्यांवर चर्चा करण्याचे टाळतात. जर रणबीरच्या घरात पाणी आणि वीज याची कमतरता नाही तर त्यांनी या विषयांवर आपले मत परखडपणे मांडणे गरजेचे आहे.' या देशाने बॉलिवूडला खूप काही दिले आहे. देशाने रणबीर कपूरलाही महागड्या गाड्या, लाईफस्टाईल आणि भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे रणबीरने देशाप्रती आपली काय जबाबदारी आहे हे दाखवणे गरजेचे आहे.

कंगनाने यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरं दिली.  आपण सिंगल नसल्याचे तिने सांगितले तर ती कोणला तरी डेट करत आहे आणि लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे तिले सांगितले. कंगनाला पार्टीमध्ये पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तिने माफी मागीतली त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले. पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींसारखा नेता याआधी देशाला कधीही लाभला नसल्याचे वक्तव्य तिन केले.