Ranbir Alia Mehendi Ceremony: लग्नाच्या फोटोंनंतर आलिया - रणबीरच्या मेहंदीचे फोटो समोर...

हातावर रणबीरच्या नावाची मेहंदी लागताचं कतरिनाने ठरला ठेका...    

Updated: Apr 16, 2022, 12:33 PM IST
Ranbir Alia Mehendi Ceremony: लग्नाच्या फोटोंनंतर आलिया - रणबीरच्या मेहंदीचे फोटो समोर... title=

मुंबई :  अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. दोघांनीही लग्न अत्यंत गुपित ठेवलं. लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर मीडियासमोर आला आणि फोटोग्राफर्सना पोजही दिली. लग्नानंतर त्यांच्या मेहंदीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेहंदीचे फोटो खुद्द आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने भावुक कॅप्शन देखील दिलं आहे. पण सर्वांच्या नजरा वेधल्या त्या म्हणजे रणबीरने वडिलांचा फोटो हातात घेतला आहे त्यावर... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. लग्नानंतर आता त्यांच्या लग्नाच्या अल्बमची चर्चा आहे. लग्नात आलिया भट्ट आणि रणबीरच्या काही जवळच्या लोकांनी हजेरी लावली.

त्यांच्या लग्नात फोटो काढण्यास सक्त मनाई होती. त्यांमुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळणार की नाही? असा आलिया - रणबीरच्या चाहत्यांना उपस्थित झाला. पण आता आलिया आणि कुटुंब स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.