Salman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video

Salman Khan Dance With Ram Charan: सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा टिझर (Yentamma Song) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय.

Updated: Apr 4, 2023, 03:45 PM IST
Salman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video title=
Salman Khan

Yentamma Song: 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) येनतम्मा या गाण्याचा (Yentamma Song) टीझर सध्या रिलीज करण्यात आलंय. या गाण्यात बॉलिवूड कलाकार राम चरण (Ram Charan) याने सलमान खान (Salman Khan), व्यंकटेश (Venkatesh) आणि पूजा हेगडे सोबत नाटू नाटू हुक स्टेप करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या गाण्याची तुफान चर्चा होताना दिसत आहे. गाण्याचा टिझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय. (Ram Charan dynamic dance moves with Salman Khan and Venkatesh goes viral on Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan)

सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटातील खास लूकची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. एप्रिलमध्ये हा चित्रपट (Salman Khan Movie) रिलीज करण्यात येणार आहे. सलमान खान हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर राम चरण, सलमान आणि व्यंकटेश यांना एकत्र स्पॉट केल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे तिघांचं कोणतं गाणं येतंय? असा सवाल विचारला जात होता.

सध्या व्हायरल होत असलेलं, हिंदी-तेलुगूचे फ्युजन असलेल्या आणि जानी मास्टर यांनी कोरियोग्राफी केलेल्या 'येंतम्मा'या गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिलं आहेत तर, पायल देव यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. त्याचबरोबर विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणं गायलं आहे.

पाहा Dance Video

दरम्यान, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला,  राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग आणि विनाली भटनागर या प्रमुख कलाकारांनी काम केलंय. सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.