Rakul Preet Singh On Sexual Awareness : बॉलिवूडमध्ये आपण पाहतो की गेल्या अनेक काळापासून प्रेक्षकांना काही शिकवूण जातील. अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'टॉयलेट : एक प्रेम कथा' (Toilet: Ek Prem Katha) , रणवीर सिंगचा (Ranveer Singh) 'जयेषभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar), अक्षयचा (OMG: Oh My God!) या चित्रपटांपासून आयुषमान खुरानाचा 'विकी डोनर' (Vicky Donor) पर्यंत अशा अनेक चित्रपटांनी आपल्याला काही तरी शिकवलं आहे. या चित्रपटातून (Social Awareness) करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं नाव ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) असे आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसली आहे. सध्या रकुल प्रीतनं एक बोल्ड वक्तव्य केलं असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
रकुलचा ‘छत्रीवाली’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. रकुल प्रीतचा हा चित्रपट 20 जानेवारी रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटा निमित्तानं रकुलनं जी मुलाखत दिली. त्यामुलाखतीत रकुल लैंगिक शिक्षणापासून कंडोमपर्यंत सगळ्या गोष्टींविषयी तिचं मत स्पष्टपणे मांडलं आहे. सगळ्यात आधी लैंगिक शिक्षणावर बोलत रकुल म्हणाली, 'खरंतर छत्रीवाली हा चित्रपटच लैंगिक शिक्षणावर भाष्य करणार आहे. कारण या विषयावर भाष्य करण लोक टाळतात आणि अशा विषयावर चित्रपट केल्यानंतर त्यावर मोकळेपणा बोलण्यास लोक प्रवृत्त होतील. इतकंच काय तर हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना या विषयी थोडं ज्ञान मिळेल. माझं तर मत आहे की या विषयावर भाष्य करणारे आणखी चित्रपट आपण करायला हवे.'
हेही वाचा : लग्न मोडलं ! 10 वेळा झाली नवरी... अखेर नेवी ऑफिसरसोबत घेतली सप्तपदी; आता Baby Bump चे फोटो व्हायरल
यावर पुढे बोलताना रकुल म्हणाली, 'खरं सांगायचं झालं तर आपल्या देशात आजही फक्त पाच टक्के लोक हे कंडोमचा वापर करतात. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर होतो. जर आपल्याला आपल्या घरातील आणि आपल्या देशातील महिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यायला हवी. जर आपण त्यांची काळजी करत नसलो तर आपल्याला आरसा दाखवणं किंवा मग त्याविषयी थोडं ज्ञान देणं गरजेचं आहे. त्यामुळे याविषयी लोकांना समजावून सांगणं त्यांना याविषयी जेवढी माहिती देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करणं गरजंच आहे. प्रत्येकालाच प्रोटेक्शन वापरायचं नाही, असं नाही. पण जर अपूर्ण माहिती मिळाली असेल तर त्यानं अनेक चुकीच्या गोष्टी होतात. फक्त पुरुषांनाच नाही तर महिलांना देखील याविषयी माहिती मिळणं गरजेचं आहे.'