मुंबई : अभिनेत्री राखी सावंतने बॉलीवुड कास्टिंग काऊचवर आपलं मत मांडलयं. फिल्म इंडस्ट्रीत कोणावर रेप होत नाही, सर्व काही आपल्या मर्जीने होतं. आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत राखीने कोरिओग्राफर यांच्या कास्टिंग काऊचवरील विधानाला सहमती दर्शवली. इथे सर्वकाही सहमती आणि स्वेच्छेने होतं. मी सरोज खान यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. 'सर्वकाही होत समोर असताना बॉलीवूडमध्ये लोक कास्टिंग काऊच बद्दल खर सांगत नाहीत. आपल काम होतय, आपल्या आजुबाजुच्यांच काम होतय मग आवाज कशाला उठवायचा असा विचार सर्व करतात. मुली करियर बनविण्यासाठी काहीपण करतात. आजकाल तर मुली म्हणतात, काहीपण करा पण मला काम द्या. यामध्ये प्रोड्युसरची काय चुक ? बऱ्याच मुली अभिनेत्री बनायला म्हणून येतात पण बनतात काही वेगळचय तुम्हाला माहितेय मी काय म्हणतेय. ' यास भाग्य समजा किंवा तुम्ही जस समजाल तसं. राखी म्हणते मी अशा मुलींना ओळखते ज्यांनी स्वत:ला प्रोड्युसरकडे सुपुर्द केलंय. फिल्म आणि फॅशन फिल्डमध्ये फक्त मुलीच नाही तर मुलही याचा शिकार बनले आहेत.
मी स्ट्रगलर्सना सांगतेय, हार मानू नका. पण काय करणार ? मुंबईत एवढी महागाई. हे सांगताना राखीने करियरच्या सुरुवातीच्या काही गोष्टी सांगितल्या. मी जेव्हा स्ट्रगलर होती तेव्हा मी देखील कास्टिंग काऊचचा सामना केला. पण असं नाही की मी ज्या प्रोड्युसर, डायरेक्टरकडे गेले ते दोषी आहेत. माझ्यासोबत हे सुरूवातीला झालं. पण माझ्याकडे प्रतिभा होती म्हणून मी हार मानली नाही. मी नाही म्हणायला शिकली.
आपल्या आयुष्याच्या रस्ता बनविण्यासाठी कलाकार म्हणून आपल्या प्रतिभेचा वापर केला. 'माझा सर्व स्ट्रगलर्सना सल्ला आहे की, धीर धरा आणि शॉर्टकट मारायला जाऊ नका,' असेही राखीने सांगितले.