राखी सावंतला जबर हादरा; Boyfriend च्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने वाढवला ताप

'ड्रामा क्वीन' राखी सावंतला प्रसिद्धीच्या झोतात कसं राहायचं हे चांगलच माहितीये. 

Updated: May 24, 2022, 02:11 PM IST
राखी सावंतला जबर हादरा; Boyfriend च्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने वाढवला ताप title=

मुंबई :  'ड्रामा क्वीन' राखी सावंतला प्रसिद्धीच्या झोतात कसं राहायचं हे चांगलच माहितीये. कधी ती इव्हेंट्समध्ये तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. तर कधी ती वैयक्तिक आयुष्याशी संबंधित खुलासे करून चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड आदिलची चाहत्यांशी ओळख करून दिली. तसंच त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसली. मात्र, राखीच्या या नात्यातही मोठी अडचण निर्माण झाली आहे. एक मुलगी दिसली जी स्वतःला आदिलची गलफ्रेंड असल्याचं सांगत आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर राखी सावंतला रविवारी म्हैसूरहून रोशिना देलावरी नावाच्या मुलीचा फोन आला. या कॉलने राखीला जरा आश्चर्य वाटलं पण तिने रोशिनाचे लक्षपूर्वक ऐकलं. राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी हा देखील म्हैसूरचा रहिवासी आहे. त्याचबरोबर, रोशिनाने आदिलला राखीशी संबंधित अनेक न सांगितल्या गेलेल्या गोष्टी सांगितल्या. ज्या जाणून ती थक्क झाली.

एका वृत्तानुसार, रोशिनाने राखी सावंतसमोर दावा केला आहे की, ती आदिल दुर्रानीची गर्लफ्रेंड आहे आणि दोघंही चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नंतर रोशिना राखी सावंतला तिच्या आणि आदिलसोबत घालवलेले क्षण सांगते. अशाप्रकारे राखीला तिने आदिलपासून दूर राहावं म्हणून हा कॉल केला होता. इतकंच नाही तर राखीने या गोष्टीवर आदिलशी चर्चाही केली आहे.

रिपोर्टनुसार, आदिलने राखी सावंतला सांगितलं की, रोशीना त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि सध्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही. त्याचबरोबर रोशिनाशी याबाबत चर्चा केली असता, तिने सहज सांगितलं की, मला या विषयावर बोलायचं नाही. पण यावेळी राखीचा आदिलवर पूर्ण विश्वास आहे. रोशीनाने फोन केला तरी ती आदिलची साथ सोडणार नसल्याचे ड्रामा क्वीनने स्पष्ट केलं आहे.

आदिल फक्त तिचा आहे आणि लवकरच दोघंही लग्न बंधनात अडकणार आहेत. आदिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना राखी म्हणाली होती की, 'मी थोडी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कारण आदिलच्या कुटुंबीयांनी मला स्वीकारलं नाही. कारण मी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील आह., खूप ग्लॅमरस आहे. त्यामुळे आदिलचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत असल्याने त्यांच्या घरात खळबळ उडाली आहे. त्याच्या घरच्यांना माझं राहणीमानही  आवडत नाही.