मुंबई : प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणार, कारण हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा 'राकेश बापट' लवकरच 'नवरी मिळे हिटलरला' ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. ह्या मालिकेच्या निमित्ताने राकेश बापट प्रथमच एका मराठी डेलीसोप दिसणार आहे. प्रेक्षकांनी टिझर मध्ये पाहिलंच असेल राकेश, AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारणार आहे. AJ ओळखला जातो तो म्हणजे मिस्टर परफेक्टशनिस्ट, ज्याचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, अतिशय शिस्तबद्ध, आणि वक्तशीरपणामुळे.
ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या सुनांनी सुरु केली आहे. प्रेक्षकांना लवकरच कळेल की कोण आहे हिटलरची नवरी. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचे लेखन केलं आहे सायली केदार हिने, तर चंद्रकांत गायकवाड मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेची निर्मिती केली आहे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने. याच निर्मितीसंस्थेची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे. तेव्हा हिटलर येतोय तुम्हाला भेटायला लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.
राकेश बापट हा एक असा अभिनेता आहे ज्याला बिग बॉसमधून लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर राकेश बापटचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. राकेश बापटने एखादी जरी पोस्ट शेअर केली तरी लगेच ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होवू लागते. राकेशने आतापर्यंत हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे, याचबरोबर खुर्ची हा त्याचा मराठी सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सगळ्यानंतर छोट्या पडद्यावर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचं दिसत आहेत. नुकताच झी मराठीच्या इन्स्टाग्रामवरुन हा या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.
झी मराठीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''नजरेत धार... शिस्त ह्याची फार...रुबाबाचं दुसरं नाव ‘अभिराम जहागीरदार’.‘नवरी मिळे हिटलरला’नवी मालिका लवकरच....''हा प्रोमो पाहिल्यांनंतर त्याचा डॅशिंग लूक पाहून सध्या राकेशची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
अभिनेता राकेश बापट हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. राकेशने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं नाव कमावलं आहे. आत्तापर्यंत राकेशने'तुम बिन', 'कोई मेरे दिल में है' आणि 'सविता दामोदर पंजाबे' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, 'सात फेरे- सलोनी का सफर' या ब्लॉकबस्टर नाटकातील नीलच्या भूमिकेने राकेशला घरोघरी ओळख मिळाली. यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप नाव कमावलं आहे. सध्या राकेश प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहेत.