Raju Srivastav Health Update: कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत यूपी सरकारचा मोठा निर्णय

Raju Srivastav यांची प्रकृती सुधारत असली तरी....; अखेर यूपी सरकारचा मोठा निर्णय  

Updated: Sep 6, 2022, 09:52 AM IST
Raju Srivastav Health Update: कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत यूपी सरकारचा मोठा निर्णय title=

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांना अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू यांनी आता शरीराची हालचाल करण्यास देखील सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर, त्यांनी पत्नीसोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केला. राजू यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी म्हणून कुटुंब आणि चाहते (Raju Srivastav fan) प्रार्थना करत आहेत. आता यूपी सरकारने राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. (Raju Srivastav Health Update)

उत्तर प्रदेश सरकारने (Government of Uttar Pradesh) एम्समधील राजू श्रीवास्तव (Raju Srivastav family) यांची काळजी घेण्याची जबाबदारी निवासी आयुक्तांवर सोपवली आहे. निवासी आयुक्त एम्समध्ये पोहोचले आणि त्यांनी राजूच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तब्येतीची सर्व माहिती घेतली. 

दरम्यान, डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही (Raju Srivastav friends) भेटण्यास मनाई केली आहे. याचे कारण संसर्गाची भीती सांगितली आहे. व्हेंटिलेटरवर संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे आता कोणीही राजू यांना भेटू शकत नाही.

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.