मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. नुकताचं अभिनेते शेखर सुमन यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजू यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
शेखर सुमन ट्विट करत म्हणाले, 'राजू अद्यापही बेशुद्ध आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहेत.' या दरम्यान पुन्हा एकदा आरोग्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. या नव्या अपडेटमुळे चाहत्यांना चिंता काहीशी कमी होऊ शकते. मात्र राजू श्रीवास्तव अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत.
Today's update on Raju according to his family members..his organs are functioning normally.Though still unconscious,doctor says,he is supposedly improving steadily.Mahadev ki kripa.Har Har Mahadev
— Shekhar Suman (shekharsuman7) August 21, 2022
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कुटुंबियांची सहमती, डॉक्टरांचा निर्णय
कुटुंबियांच्या सहमतीनंतर श्रीवास्तव यांना भेटायला कोणीच जाणार नाही, असा निर्णय डॉक्टरांनी खबरदारी म्हणून घेतला आहे. याशिवाय काही नातेवाईकांचे ऑडियो मेसेज श्रीवास्तव यांना ऐकावले जात आहेत. त्यामुळे श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचीतसा फरक आहे.