कॉमेडियन कपिल शर्माला अफलातून रॅम्प वॉक; Video पाहून पोट धरून हसाल

कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 22, 2022, 10:51 AM IST
कॉमेडियन कपिल शर्माला अफलातून रॅम्प वॉक; Video पाहून पोट धरून हसाल title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरच त्याचा लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) पुन्हा घेऊन येत आहे. अभिनेता आणि कॉमेडियन असण्यासोबतच तो एक उत्तम मॉडेल देखील आहे आणि यावेळी त्याची स्टाईल चाहत्यांसमोर पाहायला मिळाली. व्हिडीओत कपिल रॅम्प वॉक करताना दिसला, पण इथेही तो कॉमेडी करताना दिसला. कपिलचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो रॅम्पवर चालतो आणि असं काही करतो की तुम्हालाही हसू अनावर होईल. 

आणखी वाचा : अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

काल रात्री मुंबईत बेटी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कपिल देखील सुंदर मॉडेल्ससोबत रॅम्पवर वॉक करताना दिसला. कपिल कुठेही असला तरी कॉमेडी त्याची पाठ सोडत नाही आणि रॅम्पवरही तेच झालं. रॅम्पवर चालताना कपिलची सुरुवात ही मस्त होती, पण नंतर त्याच्या आत असलेला कॉमेडियन समोर आला आणि तो फीमेल मॉडेल ज्या प्रकारे फोटो काढण्यासाठी पोज देतात तशी पोज देई लागला. कपिलला पाहून तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक हसू लागले. कपिलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

आणखी वाचा : कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल

कपिलच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला रणवीर सिंगपासून प्रेरित झालास असे म्हटले आहे, तर काहींनी त्याला परफेक्ट म्हटलं आहे. एवढंच काय तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत कपिलला देशातील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला वाटलं करण जोहर कुठून आला.' अनेकांनी कपिलचे वर्णन 'रणवीर 2.0' असे केले आहे. एक यूजर म्हणाला- कपिल, तू गिन्नीची ट्राउझर घालून का आलास?