मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा इंडस्ट्रीतील असा अभिनेता आहे ज्याने जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्याचं आयुष्य एका पुस्तकाप्रमाणे आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर 'संजू' ही बायोपिक शुक्रवारी भेटीला येत आहे. यामध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. संजूच्या ट्रेलरमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
बॉलिवूडलाइफने दिलेल्या माहितीनुसार, संजू सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानीने मीडियाशी बोलताना सांगितले की, संजय दत्त आपल्या तरूणपणात मुलींचे मन जिंकण्यासाठी काही ट्रिक वापरायचे. राजू हिरानीने सांगितले की, संजय दत्तला अनेक मुली पसंद पडत. त्या मुलींना तो आपल्या आईच्या कबरजवळ घेऊन जात असे. त्यानंतर ती मुलगी संजय दत्तशी भावनिक अडकून जात असे. आणि त्या मुलींना देखील कळत नसे की संजय दत्त खोटं बोलत आहे.
29 जूनला संजू रिलीज होणार
संजय दत्त याच्यावर आधारित संजू ही बायोपिक शुक्रवारी 29 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमांत रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी आतुर आहेत.