.. यामुळे आमीर खानने 'संजू' सिनेमांत काम करण्यास दिला नकार

आमीर खानने केला स्वतः खुलासा 

.. यामुळे आमीर खानने 'संजू' सिनेमांत काम करण्यास दिला नकार  title=

मुंबई : संजय दत्तच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आणि जोरदार चर्चा रंगली. रणबीर कपूरच सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. असं संगळ असताना संजय दत्तच्या बायोपिकमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण आता या ट्रेलरनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण अशी चर्चा आहे की, आमीर खानने स्वतः हा सिनेमा करायचं नाकारलं आहे. आणि याबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी स्वतः काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 

काय म्हणाले राजकुमार हिरानी?

राजकुमार हिरानी यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, कोणताही सिनेमा करताना ते एकदा तरी आमीर खानशी चर्चा करतात. तसेच या सिनेाबाबत देखील त्यांनी आमीरसोबत चर्चा केली होती. आमीर खानने ही स्क्रिप्ट खूप मनापासून ऐकली होती. हिरानी यांनी आमीरला सुनील दत्त यांच कॅरेक्टर प्ले करण्यास सांगितलं होतं. थोडा वेळ घेऊन आमीर खानने सांगितलं की, सुनील दत्त यांची जी भूमिका होती त्याकरता थोड वजन वाढवण गरजेचं होतं. आणि 'दंगल' या सिनेमाकरता आमीरने वजन वाढवलं होतं. आता पुन्हा सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी वजन वाढवणं गरजेचं होतं. पण एकसारखी तशीच भूमिका केल्यामुळे आमीरला तरूणपणाची भूमिका साकारता येणार नाही अशी शंका होती. म्हणून त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. आणि आता ही भूमिका अभिनेता परेश रावल करत आहेत. 

आमीर खानने का नाकारली भूमिका? 

आमीर खानने एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हिरानी यांनी ही स्क्रिप्ट दाखवली. या बायोपिकमधील मला संजय दत्तची भूमिका अधिक भावली. पण ती भूमिका रणबीर कपूर करत असल्याचं कळलं. हिरानी यांनी मला सुनील दत्तची भूमिका करण्यास सांगितलं. मी थोडा विचार केला. पण माझा जीव संजूया भूमिकेत असल्यामुळे मला सुनील दत्त यांच्या भूमिकेला न्याय देता येणार नाही. आणि यामुळेच ही सुनील दत्त यांची भूमिका नाकारली.