Rajiv Kapoor Birthday Special : बॉलिवूड चित्रपटसृष्टी म्हटलं की त्यातील काही ठरावीक घराणी प्रेक्षकांना आठवतात. त्यातत खान कुटुंब आणि कपूर कुटुंब यांचा तर जणू दबदबाच आहे. कपूर कुटुंब हे गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. त्यांच्या पिढ्यानं पिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करच असल्याच्या आपणही पाहत आहोत. सुरुनातीवा कपूर कुटुंबातील महिला या लग्न केल्यानंतर मोठ्या पडद्यापासून लांब रहायच्या. मात्र, आता कपूर कुटुंबातील महिला देखील फक्त चित्रपटसृष्टीवर नाही तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. पण तुम्हाला माहितीये का या कुटुंबातील एका अभिनेत्याला चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्याचा प्लॅन असताना एक चित्रपट केला. मात्र, चित्रपटातील बोल्ड सीन चर्चेत राहिले आणि या अभिनेत्याची आज अनेकांना विसर पडली आहे. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्याविषयी...
कपूर कुटुंबातील या अभिनेत्याचे नाव राजीव कपूर आहे. राजीव कपूर यांचा आज 25 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यांनी 1985 साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे वडील राज कपूर यांनीच केले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात राजीव कपूर यांच्यासोबत अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटातील मंदाकिनी यांचे सीन चर्चेत राहिले. इतकंच नाही तर राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना एक वेगळा कॉन्टेन्ट दिला होता. या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटातून सगळ्यात जास्त लोकप्रियता ही मंदाकिनी यांना मिळाली तर राजीव यांना प्रेक्षक जणू काही विसरले होते. त्यामुळे राजीव कपूर यांना त्यांचे वडील राज कपूर यांचा राग आला होता. कारण त्यांची इच्छा होती की त्यांच्या वडिलांनी त्यांना महत्त्व देत चित्रपट करायला हवे पण राज कपूर यांनी तसं केलं नाही. त्यामुळे राजीव कपूर वडील राज यांच्यावर नाराज झाले होते.
राज कपूर यांच्या निधनानंतरही राजीव कपूर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नव्हते. कलाविश्वातील प्रतिष्ठीत कुटुंबात पडलेली ही वादाची ठिणगी इतकी वर्ष धुमसतच राहिली...
हेही वाचा : 'त्यांनी मला मारलं किंवा खोलित बंद...', आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीनं सांगितलं घटस्फोटाचं कारण
राजीव यांनी वडिलांचा राग आल्यानंतर इतर बॅनर्सचे चित्रपट केले. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांच्या करिअरचा ग्राफ जणू हळू हळू खाली जाऊ लागला होता. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, 9 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले.