रजनीकांतचा पहिला 'सेल्फी व्हिडिओ' वेगानं वायरल

सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jul 6, 2017, 04:12 PM IST
रजनीकांतचा पहिला 'सेल्फी व्हिडिओ' वेगानं वायरल title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं वायरल होताना दिसतोय. 

हा व्हिडिओ रजनीकांत यांचा पहिला वहिला सेल्फी व्हिडिओ ठरलाय. अमेरिकेत फरारी गाडीनं फेरफटका मारताना हा व्हिडिओ त्यांनी शूट केलाय. हा पहिलाच अनुभव असल्यानं 'लाल बटन ऑन हो गया?' असा प्रश्नही विचारताना ते या व्हिडिओत दिसत आहेत. 

रजनीकांत सध्या आपली मुलगी ऐश्वर्यासोबत अमेरिकेत आहेत. गेल्या महिन्यात आपल्या नियमित मेडिकल चेकअपसाठी ते अमेरिकेत दाखल झालेत. 

लवकरच रजनीकांत यांचा 'काला' हा तमिळ सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. या सिनेमाचं पहिल्या टप्प्यातलं शूटींग पूर्ण झालंय. या सिनेमात त्यांच्यासोबत नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अंजली पाटील, पंकज त्रिपाठी, समुथिरकानी आणि साक्षी अग्रवाल दिसणार आहेत.