राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. 

Updated: Nov 16, 2021, 03:55 PM IST
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्याविरुद्ध आणखी तीन फसवणुकीच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. याआधी त्यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फॅशन टीव्हीचे ऑल इंडिया हेड अली काशिफ खान हे मुख्य आरोपी आहेत. या सगळ्या तक्रारींचा एकत्रित तपास मुंबई पोलीस करू शकतात.

नुकताच गुन्हा दाखल झाला
नुकतेच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रे पोलिसांना माहिती देताना, तक्रारदाराने जुलै 2014 पासून आतापर्यंत मेसर्स एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे संचालक, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केल्याचं सांगितलं होतं.

मुंबईतील एका व्यापारीने या कपल आणि एसएफएल फिटनेस कंपनीचे संचालक काशिफ खान यांच्यावर १.५१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील या व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी आईपीसी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र आता शिल्पा आणि राजवर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर दोघांच्याही अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

पोर्नोग्राफी केसमध्ये करण्यात आली होती अटक
राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून तुरुंगात होता. राज कुंद्राची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज यांनी मीडियापासून अंतर राखलं आहे. त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केलं. राज आणि शिल्पाचे आयुष्य हळूहळू रुळावर येऊ लागलं. दोघेही नुकतेच एकत्र मंदिरात जाताना दिसले. मात्र आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राजच्या आरोपांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.