मुंबई : बॉलीवुडचे प्रसिद्ध दिवगंत अभिनेता राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांचं आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाल. त्या 87 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यामुळे त्यांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. या निधनाच्या बातमीनंतर बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रेटी ऋषी कपूर यांच्या घरी पोहोचले आहेत.
राज कपूर आणि कृष्णा यांच 1946 मध्ये लग्न झालं होतं. हा तो काळ जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.