कंगनाच्या ‘या’ चित्रपटातून आणखी एका चेहऱ्याची एक्झिट

या चित्रपटाच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर होताना दिसत नाही आहेत.

Updated: Sep 30, 2018, 10:20 PM IST
कंगनाच्या ‘या’ चित्रपटातून आणखी एका चेहऱ्याची एक्झिट  title=

मुंबई: अभिनेत्री कंना रणौत ही तिच्या चौकटी बाहेरील भूमिकांसाठी ओळखली जाते. अशाच एका आव्हाकनात्मक भूमिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती भूमिका म्हणजे झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांची. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कंगना तिच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तरीदेखील या चित्रपटाच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर होताना दिसत नाही आहेत.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोनू सूद या अभिनेत्याने तडकाफडकी कंगनाचा हा चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं.

त्यामागोमाग आता त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे स्वाती सेमवाल.

ऐतिहासिक कथानक असणाऱ्या या चित्रपटामध्ये स्वातीने पार्वती (सदाशिवराव भाऊंची पत्नी) ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत होती.

गेल्या काही दिवसापासून स्वाती हा चित्रपट सोडणार अशा चर्चा होत्या. पण, त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. आता मात्र खुद्द स्वातीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला फारसं महत्व राहिलं नव्हतं. त्यामुळे टीमशी चर्चा केल्यानंतरच मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला’, असं स्वातीने सांगितलं.  त्यामुळे आता आहेत त्या कलाकारांच्या साथीने रुपेरी पडद्यावर झळकणारा कंगनाचा हा चित्रपट कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.