पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात माजी आयुक्तांचा मुलगा

पत्नीच्या निधनानंतर माजी आयुक्तांच्या मुलाला 'या' अभिनेत्रीने दिली नवी उमेद, प्रेम म्हणजे हेच का....   

Updated: Sep 27, 2022, 10:26 AM IST
पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात माजी आयुक्तांचा मुलगा title=

मुंबई : प्रेम (Love) ही अशी भावना आहे, जी कधी विसरता येत नाही. जेव्हा आपण संकटात असतो आणि तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला जगण्याची नवी उमेद दिली (Love Of Life), तर जीवन पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी एक कारण मिळतं. असंच काही झालं आहे एका अभिनेत्यासोबत. या अभिनेत्याची ओळख कलाविश्वात खलनायक म्हणून आहे. या अभिनेत्याचं नाव आहे राहुल देव. (Rahul Dev)

राहुलचे वडील (Father Of Rahul Dev)
राहुल देवने अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. राहुलची ओळख फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित नाही. राहूलचे वडील दिल्लीचे माजी आयुक्त (former commissioner of Delhi) होते. राहुलच्या वडिलांचं नाव हरी देव असं होतं. 

राहुलचं करियर (Rahul's career)
राहुलने 2000 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. 'चँपियन' सिनेमातून राहुल प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री मनिषा कोइराला मुख्य भूमिकेत झळकली. 

याशिवाय तमिळ, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, बंगाली आणि मराठी सिनेमांमध्ये राहुलने आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. या व्यतिरिक्त राहुल देवच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे.

राहुलचं खासगी आयुष्य (Rahul's personal life)
प्रोफेशनल आयुष्यापेक्षा राहुलचं खासगी आयुष्या तुफान चर्चेत राहिलं. कर्करोगामुळे पत्नीचं निधन झाल्यानंतर राहुलने एकट्याने मुलाचा सांभाळ केला. 

पण कालांतराने राहुलच्या आयुष्य अभिनेत्री मुग्धा गोडसेची (Mugdha Godse) एन्ट्री झाली. दोघांच्या नात्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. राहुल आणि मुग्धामध्ये तब्बल 18 वर्षांचं अंतर आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला.