Sonali Kulkarni: मराठी सिनेसृष्टीसह हिंदीमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) अभिनेत्री राधिका आपटेबद्दलचं (Radhika Apte) एक सिक्रेट शेअर केलं. लाडक्या सिने अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. अशातच राधिका आपटेने मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडली आहे. अशातच राधिकाने एका रात्री आपली झोप मोडली असा थेट आरोप सोनाली कुलकर्णीने लावला.
थांबा खरं तर हा एक किस्सा आहे, आरोप नाही...तर झालं असं की, जेव्हा सोनाली पुण्यात ‘रेस्टॉरंट’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. रात्रीचं शुटिंग संपवून मी घरी येवून गाढ झोपले होते. त्यानंतर तासाभरात आईने मला उठवलं आणि तुझी मैत्रीण आली आहे, असं सांगितलं. मी अर्धवट झोपेतून उठून बघायला गेले तर एक क्यूट मुलगी उभी होती. (Radhika Apte was woken up Sonali Kulkarni in night nmp)
ती दुसरी तिसरी नसून राधिका आपटे होती. त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखतं नव्हतं. म्हणून मी तिला विचारलं, तू कोण आहेस? त्यावर ती क्यूट मुलगी म्हणाली की “मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो असं सांगितलं. राधिका तेव्हा चित्रपटसृष्टीत नवीन होती आणि तिला मुंबईत करिअर करण्यासाठी माझं मार्गदर्शन हवं होतं.
छोट्या पडद्यावरील ‘बस बाई बस’ (bus bai bus) या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी आली असताना अभिनेता सुबोध भावी (subodh bhave)यांनी तिला हा प्रश्न विचारला होता. राधिका आपटेने तुझी झोप उडवली होती, तेव्हा सोनाली कुलकर्णीने हसत हा सगळा किस्सा सांगितला. त्याच वेळी सोनालीने राधिकाच्या या धाडसाचं कौतुकही केलं. आज तिचा प्रचंड अभिमान असल्याचंही आर्वजून सांगते.