मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmit Sen) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सुष्मिता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कार राहते. सुष्मिता लवकरच ‘ताली’ या तिच्या आगामी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करत आहे. या वेबसीरिजची पटकथा ही ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारित आहे. सुष्मिता गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसत नव्हती या विषयी बोलली आहे.
चित्रपट समीक्षक सुचित्रा त्यागी यांना दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सुष्मिता म्हणाली की 'मला हे माहित होतं की मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात मी सगळ्यात महत्त्वाचं काय त्याचं प्राधान्य ठरवलं होतं. मला ज्या भूमिका करायच्या होत्या त्या मला मिळत नव्हत्या. तर मला कल्पना होती त्याचं कारण माझं वय आहे. दरम्यान, स्क्रीन समोर माझा चेहरा कसा दिसेल याचा विचार करूनच मी 10 वर्ष काम केलं नव्हतं.'
पुढे कामाबद्दल आणि तिच्या ओळखीविषयी बोलताना सुष्मिता म्हणाली, 'मला माहित नाही की माझी मानसिकता काय होती किंवा कदाचित मी स्वतःला तिथे बाहेर ठेवत नव्हते. मी नेटवर्किंगमध्ये कधीच चांगली नव्हते’. (Sushmita Sen says she did not get roles in Bollywood due to her reluctance to networking and her age )
दरम्यान, 2010 साली सुष्मिता साली ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर सुष्मितानं 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्या या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शोचे 2 सीझन आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत, तर तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरु आहे. या सीरिजमध्ये सुष्मितानं जे काम केलं त्यामुळे तिच्या भूमिकेच आणि अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. तर दुसरीकडे तिचं ललीत मोदी यांच्यासोबत असलेलं रिलेशनशिप चर्चेत आहे.