छेडछाड केल्याप्रकरणी राधिका आपटेने लगावली कानाखाली

पाहूया आणखी काही अभिनेत्रींचा अनुभव 

छेडछाड केल्याप्रकरणी राधिका आपटेने लगावली कानाखाली  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा आज 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस. 1985 मध्ये राधिकाचा जन्म तामिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला. राधिका आपटे आतापर्यंत कास्टिंग काऊच, ड्रेसमुळे ट्रोल होणे, कुणा कलाकारासोबत असलेलं अफेअर यामुळे चर्चेत होती. या अभिनेत्रीसोबत छेडछाड केल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या. या प्रकरणासंदर्भात राधिकाने अगदी सडेतोड उत्तर दिल्याचं समोर आलं आहे. यानिमित्त आपण अशाच चार अभिनेत्रींना भेटणार आहोत ज्यांनी छेडछाड प्रकरणावर आवाज उठवला आहे. 

जया प्रदा - या प्रकरणात अभिनेत्री जया प्रदा हिचं नाव समोर येतं. एका सीनच्यावेळी अभिनेता दलीप ताहिल अगदी विचित्र वागत होते. त्यांनी जया प्रदाला अगदी घट्ट पकडलं होतं. अशावेळी दलीप यांच्यापासून स्वतःला रोखण्यासाठी जयाने खूप जोरात कानाखाली मारली होती. एवढंच नाही तर पुढे म्हणाली होती की, ही रिअल लाईफ नाही रिल लाईफ आहे. 

ब्लॉकबस्टर फिल्म 'बाहुबली' बाबत सगळ्यांना माहितच आहे. या सिनेमात एक आयटम साँग आहे. या गाण्याच्यावेळी अभिनेत्री स्कारलेट विल्सनसोबत असाच एक प्रकार घडला होता. गाण्याच्यावेळी एक व्यक्ती सतत अभिनेत्रीशी गैरवर्तणूक करत होता. स्कारलेटने याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केलं होतं मात्र हद्द पार केल्यावर स्कारलेटने उत्तर दिलं. 

अभिनेत्री गीतिका त्यागीला सिनेमात 'वन बाय टू' असं समजलं जातं. अभिनेत्री गीतिका देखील छेडछाडीची शिकार आहे. एका कार्यक्रमात दिग्दर्शक सुभाष कपूर हिला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र गीतिका शांत न बसता त्यावेळी त्या दिग्दर्शकाच्या जोरात कानाखाली मारली.