सपना चौधरी थिरकली 'सुपरस्टार'वर, लाखोंची पसंती

तिने आपल्या डान्सिंगने स्वत:ची वेगळी ओळख बनविली आहे. 

Updated: Sep 7, 2018, 10:54 AM IST
सपना चौधरी थिरकली 'सुपरस्टार'वर, लाखोंची पसंती title=

मुंबई : हरियाणा डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपना चौधरीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ नाव कमावलं आहे. आयुष्याच्या सुरूवातीला तिला खूप मोठा संघर्ष करावा लागला पण आज तिने आपल्या डान्सिंगने स्वत:ची वेगळी ओळख बनविली आहे. आपले फोटो, व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Another click from the shoot #photoshoot #jewellery #shootday

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सुपरस्टार 

नुकतेच तिचा 'सुपरस्टार' या गाण्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात झालायं. या गाण्याचे लिरिक्स तरुण पांचालने लिहिले असून माही पांचालने याला आवाज दिलायं. या गाण्यात सपनाचे वेगवेगळी रुपं पाहायला मिळत आहेत.

गाण्याची सुरूवात एका सुंदर घरापासून होते. पहिल्याच सीनमध्ये ती झाडांना पाणी घालताना दिसत आहे. यानंतर म्यूझिकसोबत गाण्याला सुरूवात होते. कोणत्या सीनमध्ये ती मॉर्डन दिसते तर कुठे ती देसी लूकमध्ये दिसतेय.

लाखोंची पसंती 

हे गाणं रिलीज झाल्यानंतर 24 तासाच्या आतच याला लाखो जणांनी हे लाईक केलंय. काही दिवसांपूर्वीच तिचं छोरी 96 हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याने सोशल मीडियावर धम्माल उडवून दिली होती.   

लोकांच मन कसं जिंकल जाऊ शकतं हे सपनाला चांगल कळू लागंलय. सपनाने हरियाणी गाण्यासोबत हिंदी, पंजाबी आणि भोजपुरी गाण्यांमध्येही काम करताना दिसते. तिच्या येणाऱ्या व्हिडिओची फॅन्स वाट पाहत असतात.