स्विमिंग सोडून वेदांत अभिनय क्षेत्रात करियर करणार? आर. माधवनने स्पष्टच सांगितल...

R. Madhavan's Son Vedaant : आर. माधवन याचा मुलगा वेंदातनं आजवर भारतासाठी स्विमिंगमध्ये अनेक पदक मिळवली आहेत. त्यानं क्षणोक्षणी भारताचं नाव उंचावलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका अभिनेत्याचा मुलगा असून त्यानं स्विमिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना आनंद झाला आहे की अभिनेत्याचा मुलगा फक्त अभिनेता नाही तर इतर क्षेत्रातही चांगल काम करू शकतो.

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2023, 05:49 PM IST
स्विमिंग सोडून वेदांत अभिनय क्षेत्रात करियर करणार? आर. माधवनने स्पष्टच सांगितल... title=
(Photo Credit : R Madhavan Instagram)

R. Madhavan's Son Vedaant : बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे त्यांची मुलं म्हणजेच स्टार किड्स देखील तितकेच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आर. माधवनचा मुलगा चर्चेत आहे. आता आर. माधवनचा मुलानं काही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही पण त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे त्याची स्विमिंग कॉम्पिटीशन आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांतनं अनेकवेळा भारताचं नाव उंचावलं आहे. त्याला स्विमिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय त्यानं घेतल्याचं अनेकवेळा ऐकलं आहे. मग एक अभिनेत्याचा मुलगा असून तो स्विमिंगमध्ये करिअर करणार यानं अनेकांना आश्चर्य झालं आहे. या सगळ्यात एका मुलाखतीत आर. माधवननं वेदांतच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर वक्तव्य केलं आहे. 

आर. माधवननं खुलासा केला की तो स्विमिंगमध्ये खूप चांगलं करत आहे. माझा त्याला पाठिंबा आहे. पण जर त्याला अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर माझी काही हरकत नाही. आर. माधवननं द न्यू इंडियनला ही मुलाखत दिली होती. यावेळी आर. माधवन वेदांतच्या करिअर विषयी बोलताना म्हणाला, माझं या चित्रपटसृष्टीवर खूप प्रेम आहे. शो बिझनेस सारखा दुसरा कोणताही बिझनेस नाही. माझ्या मुलाला जेव्हा केव्हा या क्षेत्रात यावंसं वाटेल तेव्हा मी त्याला अडवणार नाही, फक्त हे क्षेत्र फारच आव्हानांनी भरलेलं आहे याची त्याला जाणीव हवी. मी आजवर त्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून अडवलेलं नाही. त्याला चित्रपटसृष्टीत यायचं असेल तर तो त्याचा निर्णय असावा, मी नक्कीच त्याला मदत करेन.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे वेदांतचं स्विमिंगवर असणारं प्रेम आणि त्यासोबत त्यानं केलेल्या उत्तम कामगिरीविषयी बोलताना म्हणाला, एक पालक म्हणून मी अशा अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि ते सुद्धा एखाद्या पालककडून की आपल्याला मुलांना चांगल्या प्रकारे मोठं करण्यासाठी काय करायला हवं. ते म्हणतात, त्यांना थोडाही मोकळा वेळ देऊ नका. त्यांच दिवसाचं टाईमटेबल हे ठरलं आहे याची काळजी घ्या आणि हे सगळं ती मुलं 4 वर्षांची असतात तेव्हा पासून ते 14 वर्षांची होतात तो पर्यंत. त्यांना जे करायचं आहे ते करू द्या पण एका ठरावीक वेळी.'

हेही वाचा : 'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...

पुढे आर. माधवन म्हणाला, 'वेदांत सध्या त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतोय. त्याला स्वप्नासाठी मेहनत करताना पाहून मला खूप आनंद होत आहे. त्याला अजून खूप काही करायचं आहे. ऑलिम्पिकसाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या त्याला जी प्रसिद्धी मिळत आहे त्यामुळे त्याचा वेदांतवर परिणाम होऊल म्हणून आम्ही त्याला या सगळ्यापासून दूर ठेवतोय.'