Shweta Bachchan Hates About Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबामधील गृहकलहाची सध्या मनोरंजनसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांमधील मतभेद एवढे विकोपाला गेले आहेत की ऐश्वर्याने बच्चन कुटुंबियांचं निवासस्थान असलेला 'जलसा' बंगला सोडून वेगळं राहण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कोणत्याही सदस्याने दिलेली नाही. असं असतानाच आता ऐश्वर्या राय बच्चनच्या लग्नापासूनचे किस्से सोशल मीडियाबरोबर प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत आहेत.
ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा सर्वात आधी सुरु झाली ती मागील वर्षीच्या एका घटनेनंतर. 2023 मध्ये पॅरिस फॅशन विकमध्ये ऐश्वर्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिची नणंद श्वेता बच्चन उपस्थित नव्हती. मात्र हे एवढ्यावरच थांबलं नाही तर दुसऱ्याच दिवशी श्वेता बच्चन या सोहळ्याला हजर राहिली कारण तिची मुलगा नाव्या नवेली नंदा दुसऱ्या दिवशी सहभागी होणार होती. अमिताभ बच्चन यांनी 2023 च्या शेवटाकडे आपल्या मालकीचा जवळपास 50 कोटींचा 'प्रतिक्षा' बंगला मुलगी श्वेताला भेट म्हणून दिला. यामुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोट होणार असून संपत्तीमधील वाटा देऊ लागू नये म्हणून अमिताभ यांनी हा बंगला मुलीला दिल्याचीही चर्चा पेज थ्रीवर रंगली.
सध्या जरी ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये वाद असल्याची चर्चा असली तरी आतापर्यंत या दोघींची केमिस्ट्री कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. एका मुलाखतीमध्ये श्वेता बच्चनने तिला ऐश्वर्या रायबद्दलच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या खटकतात याबद्दल आपली मतं व्यक्त केली होती. 'कॉफी विथ करण' च्या 6 व्या पर्वामध्ये श्वेताने ऐश्वर्याबद्दल बोलताना, "ती स्वत:च्या कर्तृत्वाने मोठी झालेली महिला असून एक उत्तम आई आहे," असं म्हणत कौतुक केलं होतं.
नक्की पाहा हे फोटो >> अमिताभ यांनी मुलीला Gift केला 50 कोटींचा 'प्रतिक्षा' बंगला आतून नेमका आहे तरी कसा?
याच कार्यक्रमामध्ये ऐश्वर्याबद्दल न आवडणाऱ्या गोष्टींसंदर्भात श्वेताला विचारण्यात आलं. त्यावरही तिने रोखठोकपणे भाष्य केलं होतं. ऐश्वर्याची कोणती गोष्ट तुला सहन होत नाही असं श्वेताला विचारण्यात आलं तेव्हा तिने, "मला तिच्या एकाच गोष्टीचा राग येतो की ती कॉल बॅक करायला किंवा मेसेजला रिप्लाय करायला वाटेल तेवढा वेळ घेते," असं श्वेता म्हणाली. पुढे बोलताना ऐश्वर्याची कोणती गोष्ट सहन करतेस याबद्दल बोलताना, "तिचा हा असा वेळेसंदर्भातील निष्काळजीपणा सहन करावा लागतो," असं श्वेताने म्हटलं होतं.