Pushpa: 'श्रीवल्‍ली' गाण्याचं श्रीदेवीशी खास कनेक्शन, 'या' गोष्टी जाणून विश्वासच बसणार नाही

गाण्याचं हिंदी वर्जन जावेद अलीनं गायलं आहे. 

Updated: Jan 17, 2022, 05:09 PM IST
Pushpa: 'श्रीवल्‍ली' गाण्याचं श्रीदेवीशी खास कनेक्शन, 'या' गोष्टी जाणून विश्वासच बसणार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांची जादू काही केल्या प्रेक्षकांच्या मनावरून ओसरताना दिसत नाही. उलट यामध्ये नवनवीन कलाकृतींची आणखी नव्यानं भर पडत चालली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला, 'पुष्‍पा: द राइज' (Pushpa: The Rise)हा चित्रपट त्याचंच एक उत्तम उदाहरण. 

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि सहकलाकारांच्या अभिनयानं नटलेल्या या अभिनयानं सिनेरसिकांना वेड लावलं आहे. 

हे वेड सध्या चित्रपटातील 'श्रीवल्‍ली' (Srivalli song) या गाण्यासाठी ओसंडून वाहूसुद्धा लागलं आहे. कारण, आतापर्यंत या गाण्यावर एकदोन नव्हे, तब्बल 7 लाख रिल्स तयार करण्यात आले आहेत. 

हे रील्स बनवणं अद्यापही सुरुच आहे. एकिकडे सामी, या गाण्यानं धुमाकूळ घातलेला असतानाच दुसरीकडे चित्रपटातील 'श्रीवल्‍ली' (Srivalli song) हे गाणं प्रेक्षकांना नव्यानं प्रेमात पाडत आहे. 

गाण्याबाबतच्या काही रंजक गोष्टी... 
- 'श्रीवल्‍ली' या गाण्याचा मुख्य गायक आहे, सिड श्रीराम. यानंच हे गाणं तेलुगू,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये गायलं आहे. 

- गाण्याचं हिंदी वर्जन जावेद अलीनं गायलं आहे. जावेदनं ते आपल्याच अंदाजात सादर करत ते वेगळ्या लोकप्रियतेपर्यंत पोहोचवलं. 

- संगीत दिग्दर्शक देवी श्रीप्रसाद यांनी आधी हिंदी गाण्यामध्ये श्रीवल्लीऐवजी श्रीदेवी हा शब्द ठेवला होता. पण, नंतर पुन्हा तो श्रीवल्लीच करण्यात आला. 

- चेन्नईतील एका स्टुडिओमध्ये अडीच तास या गाण्याचं ध्वनिमुद्र सुरु होतं. 

- मजेशी गोष्ट अशी की हे गाणं श्रीदेवी आणि श्रीवल्ली अशा दोन्ही शब्दांसह दोन वेगळ्या प्रकारे तयार ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. 

जावेद अलीला कसं मिळालं हे गाणं? 
देवी श्रीप्रसाद आणि जावेद अली एकमेकांच्या ओळखीचे. मागच्या वर्षीच इलियाराजा यांनी जावेदला एका गाण्यासाठी चेन्नईला बोलवलं होतं. 

इलियाराजा यांच्यासाठी गाणं गाण्याची जावेदची ती पहिलीच वेळ. पण, झालं असं की तेव्हाच त्याला देवी श्रीप्रसादचा फोन आला. 

जावेद चेन्नईला इलियाराजाच्या गाण्यासाठी गेला होता. पण, त्यांचा फोन आला नाही तेव्हा देवी श्रीप्रसादनं त्याला आपल्याकडे बोलवून घेतलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar)

'रेकॉर्डिंग सुरु कर, इलियाराजा यांचा फोन आलाच तर तू तिथे जा', असं त्यानं जावेदला सांगितलं. त्या दिवशी इलियाराजा यांचा जावेदला फोन तर नाही आला. पण, इथे  'श्रीवल्‍ली' गाण्याच्या ध्वनीमुद्रणाचं काम मात्र झालं होतं.