अभिनेत्रीच्या नशीबात सतत अपयश, त्यानंतर एका बोल्ड सीनमुळे रातोरात झाली स्टार

आज ती अभिनेत्री आहे सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक...  

Updated: Jan 17, 2022, 04:28 PM IST
अभिनेत्रीच्या नशीबात सतत अपयश,  त्यानंतर एका बोल्ड सीनमुळे रातोरात झाली स्टार title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचं काम उत्तम असून देखील कायम वाट्याला अपयश आलं. एकापेक्षा एक भूमिकेच्या माध्यमातून कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस आले, पण नशीबात अपयश असल्यामुळे त्यांच्या वाट्याला निराशा आली. अशा परिस्थितीत काही कलाकारांनी तर अभिनयाला राम राम ठोकला. पण काही कलाकारांनी मेहनतीवर आणि जिद्दीवर विश्वास ठेवला. अशाच कालाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रसिका दुग्गल. 

रसिका दुग्गलने 'स्मोकिंग', 'हायजॅक', 'औरंगजेब', 'बॉम्बे टॉकीज', 'किस्सा', 'वन्स अगेन', 'लव्ह स्टोरीज', 'हमीद', 'मंटो' यासह अनेक चित्रपटात काम केले. पण ओटीटीच्या  एका  ऑफरने तिचं नशीब चमकले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika (@rasikadugal)

2018 मध्ये, रसिकाने पंकज त्रिपाठी स्टारर 'मिर्झापूर' लोकप्रिय वेब सीरिजमध्ये त्यांच्या पत्नी बीना त्रिपाठीची भूमिका साकारली होती. पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रसिका दुग्गलने सीरिजमध्ये प्रचंड बोल्ड सीन दिले. 

रसिकाच्या बोल्ड कॅरेक्टरने प्रचंड दहशत निर्माण केली आणि ती रातोरात स्टार झाली. तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. त्यानंतर रसिकाने कधी मागे वळून पाहिलं नाही. 

'मिर्झापूर' नंतर ती अनेक सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली, 'वे मेड इन हेवन', 'दिल्ली क्राइम', 'आउट ऑफ लव', 'अ सूटेबल बॉय' आणि 'ओके कंप्यूटर' या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.