Pushpa Box Office Collection: बॉक्सऑफिसवर 'पुष्पा'चा दणका; जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट 

Updated: Jan 4, 2022, 01:43 PM IST
Pushpa Box Office Collection: बॉक्सऑफिसवर 'पुष्पा'चा दणका; जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाचीच सर्वदूर चर्चा सुरु आहे. फक्त दाक्षिणात्य भाषांमध्येच नव्हे, तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. 

चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता, ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. 

जागतिक स्तरावर या चित्रपटानं तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर, भारतात हा चित्रपट 200 कोटींचा आकडा गाठू शकला आहे. 

Pushpa मधील लोकप्रिय डायलॉग म्हणत डेव्हिड वॉर्नरने जिंकलं मन, व्हिडीओ व्हायरल

 

संपूर्ण भारतात पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 166 कोटी रुपये जमवले होते. 

पुढे या चित्रपटाला 'स्पायडर मॅन' आणि '`83' अशा चित्रपटांनी टक्कर दिली. असं असतानाही या चित्रपटानं जागतिक स्तरावर 300 कोटी रुपयांची कमाई केली. 

Pushpa साठी Allu Arjun ला मिळाले इतके रुपये, बाकीच्या स्टारकास्टच्या फी चा आकडा कोट्यवधीत

चित्रपटाच्या हिंदी वर्जननं आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. ज्यामुळं आता इथंही चित्रपटाच्या कमाईचे आकडे 75 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. 

चित्रपटाला समीक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) येत्या काही दिवसांमध्ये आणखी किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.