'या' अभिनेत्याची फी ऐकून 'पुष्पा'ला बसला धक्का, झुकेगा नही म्हणता म्हणता... 

चित्रपट दिग्दर्शकाच्या भरमसाट फीमुळे अभिनेता अल्लू अर्जुनला धक्का बसला असून हा प्रोजेक्ट मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे. 

Updated: May 17, 2022, 04:27 PM IST
'या' अभिनेत्याची फी ऐकून 'पुष्पा'ला बसला धक्का, झुकेगा नही म्हणता म्हणता...  title=

मुंबई : 'राजरानी' या तमिळ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर, एटली कुमार तामिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता बनत आहे. मर्सल, थेरी आणि बिकिलसह त्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या चित्रपटांना समीक्षक आणि  ट्रेड एनालिस्टों चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं आहे. एटलीला त्याच्या चित्रपटांच्या यशानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबतच्या आगामी चित्रपटाच्या बातम्यांनंतर खूप मागणी आली आहे. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक अलीकडेच 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनसोबत एका प्रोजेक्टसाठी चर्चेत होता. मात्र आता हा चित्रपट धोक्यात आला आहे.

एटलीच्या फीने अल्लू अर्जुनला थक्क
चित्रपट दिग्दर्शकाच्या भरमसाट फीमुळे अभिनेता अल्लू अर्जुनला धक्का बसला असून हा प्रोजेक्ट मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे. एटलीने 35 कोटींची मागणी केल्याचं बोललं जात आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी. याआधी, अशी बातमी आली होती की, 'पुष्पा' अभिनेता एटलीसोबत पेन इंडिया चित्रपटात काम करण्याचा विचार करत आहे. Lyca Productions ने याआधी 2.0, Kaththi आणि Darbar या तमिळ मेगा स्टार्सना अनेकवेळा सपोर्ट केला आहे.

'लाइका' ने अल्लूला दिले 100 करोड
अल्लू अर्जुनचा हा बहुचर्चित आगामी चित्रपट एक उत्तम काम मानला जात होता. पण 'पुष्पा : द राइज'च्या यशानंतर अल्लू अर्जुनने आपली फी थोडी वाढवली आहे. रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला लायका प्रॉडक्शन हाऊसने रु. 100 कोटी दिले.