Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी... सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या

'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. 

Updated: May 5, 2022, 01:11 PM IST
Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी... सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांना फक्त देशातच नव्हे, तर परदेशातही कमालीची लोकप्रियता आहे. अशा या चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार म्हणजे जणू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा त्यापैकीच एक. 

(Pushpa ) 'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. जळीस्थळी काष्ठीपाषाणी त्याचंच नाव सर्वांच्या तोंडी होतं. 

बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारा हा अभिनेता एकिकडे चित्रपटांतून दमदार कामगिरी करत होता, तर दुसरीकडे त्याच्या संपत्तीत चांगलीच भर पडत होती. 

networth.co.in च्या माहितीनुसार अल्लू अर्जुननं आतापर्यंत 358 कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. तो असं आयुष्य जगतो की, पाणारेही भारावून जातील. सूत्रांच्या माहितीनुसार अल्लू अर्जुनच्या घरातीत किंमत 100 कोटी रुपये इतकी आहे. 

ऐसपैस अंगण, लिविंग रुम, डायनिंग रुम, स्वयंपाकघर आणि इतरही सर्व सोयीसुविधा त्याच्या या भव्य महालवजा घरात आहेत. 

त्याच्या घराबाहेर आलिशान कारची रांग आहे. 4-5 कोटी रुपयांच्या घरात या कारची किंमत असल्याचं सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुनकडे रेंज रोवर, ऑडी आणि BMW अशा कार आहेत. जॅगुआर, पॉर्शे अशा कारही त्याच्याकडे आहेतच. शिवाय सूत्रांची माहिती पाहिल्यास त्याच्याकडे स्वत:चं प्रायव्हेट जेटही आहे. 

स्वत:ची व्हॅनिटी वॅन असणाऱ्या कलाकारांपैकी अल्लू अर्जुन एक. जवळपास 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्याची ही कस्टमाईज व्हॅनिटी तयार करण्यात आली. तिची किंमत 7 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. 

अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी 18-20 कोटी रुपये इतकं मानधन एका चित्रपटासाठी घेतो. 'पुष्पा' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी त्यानं 60  कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात आलं. 

दिवसागणिक अल्लू अर्जुनची वाढती लोकप्रियता आणि त्याच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय पाहया या अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा असाच वाढत राहील यात दुमत नाही.