हे लोक मला मारतील; समंथावर का आली असं म्हणायची वेळ ?

जीवनाची गाडी रुळावर येत होती, तोच ...

Updated: Jan 10, 2022, 01:26 PM IST
हे लोक मला मारतील; समंथावर का आली असं म्हणायची वेळ ?  title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अदांनी चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे सामंथा रुथ प्रभू. आघाडीची अभिनेत्री होण्यापर्यंतचा तिचा प्रवास फारसा सोपा नव्हता. पण, मेहनतीच्या बळावर समंथानं हे साध्य करुन दाखवलं. (Samantha Ruth Prabhu)

एकिकडे कामाच्या बाबतीत ती यशस्वी ठरत असतानाच दुसरीकडे खासगी आयुष्यात मात्र तिला बऱ्याच वादळांना सामोरं जावं लागत होतं. 

आता कुठे समंथाच्या जीवनाची गाडी रुळावर येत होती, तोच तिला पुन्हा एका आव्हानाचा सामना करावा लागला. 

हे लोक तर मला मारून टाकतील... असं म्हणत तिनं मनातील भीतीही बोलून दाखवली. 

समंथाला नेमकं कोण आणि का मारेल असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळं तुमच्या मनातील भीती स्पष्ट होईल. 

कारण, ही बाब तितकी गंभीर नाही. समंथा असं म्हणालीये खरी, पण ते काहीशा विनोदी अंदाजात. 

'पुष्पा' या अतिशय लोकप्रिय चित्रपटामध्ये तिनं एक आयटम साँग साकारलं आहे. या गाण्यासाठी समंथानं बरीच मेहनत घेतली. 

नृत्यापासून अपेक्षित अदा साकारण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिनं स्वत:वर मेहनत घेतली. 

या साऱ्यामध्ये एक वेळ अशीही आली, जेव्हा समंथानं हातही टेकले. पण, तिच्यासाठी काम करणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या टीमनंही तिला उसंत घेऊ दिली नाही. 

त्याच कारणाने ती, हे लोक मला मारतील असं म्हणताना दिसली, 

'ऊ अंटावा ऊ ऊ अंटावा' या गाण्याचा बीटविन द शॉट्स व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जिथे समंथा या गाण्यासाठी स्वत:ला नेमकं कसं तयार करत होती हे पाहायला मिळत आहे.