कतरिनाला ताटकळत ठेवून विकी 'तिच्या'सोबत 5 तास गायब

 अभिनेत्री कतरिना कैफ हॉटेलमध्ये 5 तास थांबली होती.

Updated: Jan 10, 2022, 01:18 PM IST
 कतरिनाला ताटकळत ठेवून विकी 'तिच्या'सोबत 5 तास गायब title=

मुंबई :  अभिनेता आणि पती विकी कौशलला भेटायला आलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हॉटेलमध्ये 5 तास थांबली होती. कारण विकी कौशल सारा अली खानसोबत 5 तास शूटिंगमध्ये व्यस्त होता. शूट पूर्ण केल्यानंतर विकी कौशलने कतरिना कैफशी संपर्क साधला.

सध्या इंदूरमध्ये बॉलिवूड चित्रपट 'लुकाछिप्पी 2' या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. रविवारी कुंवर मंडळीमध्ये चित्रपटाचें शूटिंग पार पडलं. अभिनेता विकी कौशलच्या तक्रारीवरून एका व्यावसायिकाला अटक केल्याचा सीन ईथे चित्रित करण्यात आला आहे. याशिवाय अन्य काही चित्रपटातील सीनही या भागात चित्रित करण्यात आले आहेत. सलग 5 तास शूटिंग सुरू होतं. त्यामुळे विकीला भेटायला कतरिनाला 5 तास त्याची वाट पाहवी लागली.

शूटिंग पाहण्यासाठी कुंवर मंडळींनी मोठी गर्दी केली होती. कतरिना कैफही दिसेल अशी लोकांना अपेक्षा होती पण कतरिना कुठेच दिसत नव्हती. विकी कौशल संपूर्ण वेळ सारा अली खानसोबत होता. यादरम्यान अनेकवेळा विकी कौशलने सारा अली खानला गर्दीतून वाचवलं.

कतरिना कैफ दिवसभर हॉटेलमध्ये असल्याची माहिती होती. विकी आणि कतरिनाचं गेल्या महिन्यात ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झालं. नुकताच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. बॉलीवूडच्या नव्या जोडीला एकत्र पाहण्याची हजारो लोकांची इच्छा होती.