'पुष्पा 2' ठरला पहिला भारतीय चित्रपट, ज्याने या गोष्टीमध्ये रचला इतिहास, अवघ्या 3 दिवसांमध्ये कमावले 500 कोटी

 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. निर्मात्यांनी जे सांगितले ते भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप महत्वाचं आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 8, 2024, 05:33 PM IST
'पुष्पा 2' ठरला पहिला भारतीय चित्रपट, ज्याने या गोष्टीमध्ये रचला इतिहास, अवघ्या 3 दिवसांमध्ये कमावले 500 कोटी title=

Pushpa 2 Worldwide Box Office Collection: साउथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5  डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये प्रचंड गर्दी करत आहेत. अवघ्या 3 दिवसांमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने 3 दिवसांमध्ये 500 कोटींचा आकडा पार केला आहे. यासोबतच या चित्रपटाने नवीन इतिहास रचला आहे. जगभरातील 'पुष्पा 2' हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आहे. 

दरम्यान, 'पुष्पा 2'  चित्रपटाचे निर्माते Mythri Movie Makers ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रेकॉर्डबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

'पुष्पा 2' ठरला पहिला भारतीय चित्रपट 

Mythri Movie Makers च्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये जगभरात किती कमाई केली, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे. सुकुमार यांचा 'पुष्पा 2'  हा चित्रपट कमी दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

सुरुवातीला हा विक्रम 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने केला होता. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये जगभरात 500 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने अनेक दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'पुष्पा 2' या चित्रपटाने रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा हा रेकॉर्ड मोडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'पुष्पा 2' या चित्रपटांना टाकले मागे

जगभरात 'पुष्पा 2' हा चित्रपट सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने 5 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर 164.25 कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी इतकी मोठी कमाई करून या चित्रपटाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने 'PK', 'टायगर जिंदा है', 'लिओ', 'संजू' आणि 'जेलर' अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. या चित्रपटाने 3 दिवसांमध्ये भारतात 380 कोटींची कमाई केली आहे.